शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पानवणकरांच्या तुफानाला पुणेकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:23 IST

म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे ...

म्हसवड : दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार करून पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरलेल्या पानवणकरांनी गावात श्रमदानाचे तुफान आणले आहे. या तुफानाला गावाबाहेरील लोकांचीही चांगली साथ लाभत असून, पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सुमारे ६० सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला आणि स्पर्धेसाठी आर्थिक योगदानही दिले.सामाजिक कार्यात नेहमीच एकोपा दाखविणाऱ्या पानवणकर ग्रामस्थांनी यावर्षी मोठ्या उत्साहात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्पर्धेपूर्वीच्या शिवार फेरी, परसबाग, मातीपरीक्षण आदी ३० पैकी ३० गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या प्रारंभाला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील हीट जोडी अंजली आणि राणा यांनीही उपस्थिती लावली होती.स्पर्धेच्या सुरुवातीपासून आजपर्यंत दररोज सुमारे सातशे लोक नियमित श्रमदानाला उपस्थिती दर्शवत असून, सुटीदिवशी नोकरदार मंडळीही श्रमदानाला उपस्थित राहत आहेत.या पार्श्वभूमीवर पुणे येथील सामर्थ्य वाद्यवृंद ग्रुप आणि शिवगृहिणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्वखर्चाने पुणे ते पानवण असा सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून सकाळी सात ते नऊ असे दोन तास श्रमदान केले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी यांत्रिक कामाच्या खर्चासाठी निधी अपुरा पडत असल्याचे पाहून सुमारे पंधरा हजार रुपयांचा कर्तव्य निधी पाणी फाउंडेशन, पानवणच्या टीमकडे सुपूर्द केला. पुणेकरांच्या या सहकार्याने पानवणकर अक्षरश: भारावून गेले.