शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाफळ विभागाला जोरदार पावसाचा तडाखा. भात शेती वाहून गेली. अनेक ठिकाणचे रस्ते फरशी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प; विरेवाडीजवळ घाट रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशी पूल पाण्याखाली गेल्याने ...

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशी पूल पाण्याखाली गेल्याने तर काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. डोंगर उतारावरील केळोली, पाडळोशी, धायटी आदी गावांत पावसाचे पाणी शेतात घुसल्याने भात शेती वाहून गेली आहे. नाणेगाव खुर्द गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गाळाने भरून पाइपलाइन वाहून गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. विरेवाडीमार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. एकूणच चाफळ विभागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चाफळ विभागात सध्या जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. उभी भात शेती वाहून गेल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. नाणेगावमध्ये शेतीचे खूप नुकसान झाले आहे. नदी आणि ओढ्याशेजारील शेतात पावसाचे पाणी गेल्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची विहीर पूर्ण गाळाने भरली आहे. पाइपलाइन वाहून गेल्याने गावचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. शिंगणवाडी येथे रस्त्यावर झाड पडून वाहतूक काही काळ बंद पडली होती. काही युवकांनी प्रसंगावधान राखत झाड हटविल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली, तर ओढ्याचे पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याची व फरशी पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे.

केळोली येथे गणपत किसन मोरे, बाजीराव किसन मोरे, आनंदा विठ्ठल साळुंखे, विजय रामचंद्र लोखंडे आदींसह अन्य शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली. डेरवण गावाला जोडणारा चिकूल ओढ्यावरील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने डेरवण, भैरेवाडी गावांचा संपर्क तुटला आहे. चाफळवरून केळोलीमार्गे पाटणला जोडणारा रस्ता विरेवाडी घाटात खचल्याने वाहतूक बंद झाली आहे. चाफळ पाडळोशी रस्त्यावरील धायटी गावानजीक ओढ्याचे पाणी फरशी पुलावरून थेट रस्त्यावर आल्याने या ठिकाणचीही वाहतूक ठप्प होऊन शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकंदरीतच विभागात पडत असलेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान केले असून शासनाने नुकसाग्रस्तांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट :

चाफळ केळोलीमार्गे पाटणला जोडणारा घाट रस्ता जागोजागी खचू लागला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. ग्रामस्थांनी या रस्त्यावरून वाहतूक करू नये, असे आवाहन शिवदैवत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

२३ ढेबेवाडी

ढेबेवाडी परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे पूल, ओढे वाहून गेले. (छाया : रवींद्र माने)