शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कºहाड, ढेबेवाडीला पावसाने झोडपले

By admin | Updated: May 21, 2014 17:36 IST

डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली : कºहाड, पाटण, फलटण, खटाव, वाई तालुक्यांत वादळी पाऊस

सातारा : जिल्ह्यातील कºहाड, पाटण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांत आज, मंगळवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर सोसाट्याच्या वार्‍याला सुरुवात झाली. त्यानंतर कºहाड, पाटण, पुसेगाव, पुसेसावळी परिसरांत चांगला पाऊस झाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी ही झाडे हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. ढेबेवाडी परिसरात अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाई तालुक्यातील कवठे परिसरालाही पावसाने झोडपून काढले. कºहाड शहरात ठिकठिकाणी उभारलेले बॅनर कोसळले. तसेच प्रीतिसंगम बागेत काही झाडे मोडून पडली. खेळण्यांचेही नुकसान झाले. परिसरातील काही घरांवरील पत्रे उडाले. तांबवे भागाला वादळी वार्‍याचा मोठा फटका बसला. घर, जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. डेळेवाडी येथील खिंडीत दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. अंबवडे येथील घरावरील पत्रा पखाड्यांसह उडून काही अंतरावरील झाडावर जाऊन पडला. कोळे येथील साई वीट कारखान्यात काम करणार्‍या मजुरांच्या सहा खोल्यांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसारोपयोगी साहित्य भिजले. वादळी वार्‍यामुळे ऊस, मका, आदी पिके भुुईसपाट झाली. ढेबेवाडी परिसरात सायंकाळी वादळी वार्‍याने थैमान घातले. (प्रतिनिधी)