शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मुसळधार पाऊस

By admin | Updated: October 3, 2015 23:08 IST

खटाव, माण, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतही पाऊस

सातारा : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी सायंकाळी सातारा शहर व परिसराला झोडपून काढले. जिल्ह्यात खटाव, माण, कोरेगाव, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतही पाऊस झाला. शहरात दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. ओढे, नाले पाण्याने भरून वाहत होते. रस्त्यावरूनही पाणी वाहत होते. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील नागरिक व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही किरकोळ विक्रेत्यांचे साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसान झाले. सातारा तालुक्यातही अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. नागठाणे येथे ओढे, नाले भरून वाहत होते. सेवा रस्तेही पाण्यात बुडाले होते. शहराच्या पश्चिमेस डोंगरभागात दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कास पुष्प पठारावर शनिवारी हजारो पर्यटकांनी भेट दिली. दुपारपर्यंत उन्हाच्या तडाख्याने पर्यटक हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पाऊस पडल्यानंतर यवतेश्वर घाटात दाट धुके पसरले होते. त्यामुळे वनराई चांगलीच खुलली होती. खटाव : खटाव तालुक्यात सायंकाळी पाच वाजता सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला. रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्यामुळे दुष्काळी भागासाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे, असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. पाटण : मल्हारपेठ (ता. पाटण) येथे दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मोठ्या पावसामुळे ओढे, नाले पाण्याने भरून वाहिले. निसरे येथे रस्त्याकडेला नाल्यात तसेच शेतात पाणी साचले होते. रस्त्यावरूनही पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना तारेचरची कसरत करावी लागली. परतीच्या पावसामुळे तूर, भात, ऊस यांसह अन्य काही पिकांना जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)