शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या तरुणाचं हृदय मुंबईत धडधडलं !

By admin | Updated: May 14, 2016 00:38 IST

अपघाती मृत्यूनंतर अवयव दान : १४ वर्षीय मुलाचा वाचला जीव

वाई : वाईच्या एका व्यापाऱ्याचा एकुलता एक कर्ता-करविता मुलगा गाडीवरून पडल्याचं निमित्त झालं. डोक्याला मार लागल्यामुळे तो थेट कोमात गेला. पुण्याच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, ‘पेशंट जगणं अवघड आहे.’ तेव्हा काळजावर दगड ठेवून त्याच्या आईनं निर्णय दिला, ‘ माझ्या मुलाचं हृदय, लिव्हर, किडनी, हात अन् डोळे दान करा !’... त्याच्या मृत्यूनंतर हृदय काढून तत्काळ मुंबईला पाठविण्यात आलं. तिथं १४ वर्षांच्या मुलाला हे हृदय रोपण करून त्याचा जीव वाचविला गेला. या हृदयद्रावक घटनेची माहिती अशी की, वाई येथील व्यापारी चंपालाल ओसवाल यांचा मुलगा मनीष (वय ३०) हा मंगळवारी रात्री दुचाकी घसरल्याने जखमी झाला. त्याच्या मेंदूला मार लागल्याने सुरुवातीला साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, दान केलेले सर्व अवयवांचे त्वरित प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे संबंधितांना अपंगत्वावर मात करणे शक्य झाले आहे. नातेवाइकांनी व रुबी हॉलच्या व्यवस्थापनाने ओसवाल कुटुंबीयांचे आभार मानले. दु:खद घटना होऊनही ओसवाल कुटुंबीयांनी समाजाप्रती तळमळ दाखविली. पार्थिवावर मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)