शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

प्रभाग रचनेवरील हरकतींवर साडेतीन तास सुनावणी

By admin | Updated: May 19, 2016 00:09 IST

कोरेगाव नगरपंचायत : जिल्हाधिकाऱ्यांसमोर १६ हरकतींवर तोंडी, लेखी युक्तिवाद

कोरेगाव : नव्याने अस्तित्वात आलेल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १६ हरकतींवर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यासमोर तब्बल साडेतीन तास सुनावणी झाली. हरकत दाखल केलेल्यांनी तोंडी आणि लेखी युक्तिवाद केला. प्रशासनाने आपलीच बाजू योग्य असल्याचे दाखवून दिल्याने हरकत घेणाऱ्यांनी आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीशिर वृत्त आहे. राज्य शासनाने दि. ५ रोजी कोरेगावात नगरपंचायत स्थापन करण्याचे आदेश काढले होते. नगरविकास विभागाने त्यानंतर नव्याने प्रभाग रचना जाहीर करून वॉर्डनिहाय आरक्षणे सोडतीद्वारे जाहीर केली होती. प्रभाग रचनेवर हरकत घेण्याच्या मुदतीत एकूण १६ हरकती प्रांताधिकारी अजय पवार यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ४ एप्रिल २०१६ रोजी काढलेल्या आदेशान्वये प्रांताधिकारी अजय पवार यांना हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी प्राधिकृत केले होते. दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाने दि. ७ मे २०१६ रोजी आदेश काढून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे सक्षम अधिकारी असून, तेच सुनावणी घेतील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मुदगल यांनी प्रांताधिकारी अजय पवार यांना प्राधिकृत केल्याबाबतचे आदेश रद्द करत बुधवारी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनामध्ये सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी मुदगल यांच्यासमोर सुनावणीस सुरुवात झाली. प्रांताधिकारी अजय पवार, नगरपंचायतीचे प्रशासक किरणराज यादव यावेळी उपस्थित होते. संजय झंवर, संजय पिसाळ, दत्तात्रय झांजुर्णे, विजयकुमार बर्गे, राहुल बर्गे, मनोज येवले, सुनील बर्गे, अ‍ॅड. अमोल भुतकर, डॉ. गणेश होळ, प्रशांत गुरव, विठ्ठलराव बर्गे, सचिन बोतालजी आदी हरकत घेतलेल्या व्यक्तींनी हरकतींच्या अनुषंगाने लेखी आणि तोंडी युक्तिवाद केला. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हाधिकारी मुदगल याबाबत लेखीस्वरूपात निकाल देणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)उच्च न्यायालयात दाद मागणार..?जिल्हा प्रशासनाने आपलीच बाजू योग्य असल्याचे सुनावणी दरम्यान सातत्याने दाखवून दिले आहे. प्रशासनाने केलेले नकाशे हेच योग्य असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत प्रशासन जवळपास सर्वच हरकती फेटाळणार असल्याचे सकृतदर्शनी वाटत आहे, त्यामुळे आम्ही आता याबाबतीत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे हरकत घेतलेल्या व्यक्तींनी सांगितले.