शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी ‘तो’ बनला देवदूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपर्डे हवेली : कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णाच्या सहवासात जायला नातेवाईकही धजावत नाहीत. अनेकवेळा बाधिताला रुग्णालयात नेण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपर्डे हवेली : कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णाच्या सहवासात जायला नातेवाईकही धजावत नाहीत. अनेकवेळा बाधिताला रुग्णालयात नेण्यासाठी कोणीच पुढे येत नाही; पण कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेलीचा युवक स्वत:च्या वाहनातून रुग्णांना दवाखान्यात पोहोचवतोय. एवढेच नव्हे तर रुग्णाच्या सर्व तपासण्या होऊन त्याला अ‍ॅडमिट करेपर्यंत तो रुग्णालय सोडत नाही, हे विशेष.

कोरोना काळात माणुसकी लोप पावत असताना कोपर्डे हवेलीतील किशोर साळवे या युवकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. आजअखेर त्याने दीडशेहून जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांना स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत केली आहे. या नि:स्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे तो रुग्णांसाठी देवदूतच ठरला आहे. कोपर्डे हवेलीतील सर्वसामान्य कुटुंबातील किशोरने औद्योगिक प्रशिक्षण घेतले असून, तो सध्या शेती करतो. दोन एकर शेतीवर त्याचे कुटुंब चालते, अशी सामान्य परिस्थिती असतानाही किशोर एक रुपयाही न घेता जीपमधून रुग्णांची वाहतूक करत आहे.

गत दीड महिन्यापासून तो गावातील कोरोना रुग्णांसाठी धडपडत आहे. ज्या घरात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून येतो, त्या घरी जाऊन त्याची विचारपूस करायची. रुग्णाला दवाखान्यात घेऊन जायचे. अ‍ॅडमिट करण्याची आवश्यकता असेल तर रुग्णाला जीपमध्ये घेऊन बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयाची शोधाशोध करायची आणि रुग्णाला अ‍ॅडमिट करूनच पुन्हा गावाकडे परतायचे, असा किशोरचा दिनक्रम आहे.

- चौकट

डबा पोहोचवतो, औषधही देतो...

रुग्णांना अ‍ॅडमिट करून किशोर थांबत नाही तर त्या अ‍ॅडमिट रुग्णाला त्याच्या घरून जेवणाचा डबा घेऊन जाण्याचे कामही तो करतो, तसेच वारंवार रुग्णालयात जाऊन रुग्णाला काही हवे-नको याचीही तो चौकशी करत असतो. गृह अलगीकरणात असणाऱ्यांना औषधे पोहोचविण्याची जबाबदारीही किशोरने सांभाळली आहे.

- चौकट

पाठीवर स्प्रे पंप घेऊन धाव

ज्या-ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल, त्या घरात स्वत: किशोर पाठीवर स्प्रे पंप घेऊन पोहोचतो. संपूर्ण घर तो सॅनिटाईझ करून देतो. गत दीड महिन्यात रात्री किंवा दिवसाही ज्या रुग्णाला गरज लागेल त्याच्यासाठी किशोर धाव घेतो.

- चौकट

मी माणसातच पाहिला देव...

किशोरचे कष्ट तसेच गावाविषयी त्याला असणारी तळमळ पाहता, बाजार समितीचे माजी सभापती दिवंगत हिंदुराव चव्हाण यांचा मुलगा शरद चव्हाण यांनी त्याला जीप दिली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी ही जीप वापरली जाते तर जमा झालेल्या लोकवर्गणीतून डिझेलचा खर्च भागवला जातो.

कोट

कोरोनामुळे होत्याचे नव्हते झाले आहे. आपण या मातीचे देणे लागतो, या भावनेतून मी गेल्या दीड महिन्यापासून ग्रामस्थांची सेवा करत आहे. गावातील कोणीही फोन केला की मी त्याठिकाणी पोहोचतो. गरज असेल तर रुग्णाला दवाखान्यात पोहोचवतो. अथवा घरी आवश्यक ती मदत करतो. मी माणसातच देव पाहिला आहे.

- किशोर साळवे

ग्रामस्थ, कोपर्डे हवेली.

फोटो : ०५ केआरडी ०२

कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील किशोर साळवे हा युवक रुग्णांना दवाखान्यात घेऊन जातो.

लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी