शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूरच्या कुस्ती मैदानात हरियाणाच्या पै. विनोदकुमारने मारली बाजी

By admin | Updated: March 16, 2017 18:03 IST

एक लाख रुपये बक्षीसासह मानाच्या चषकाचा मानकरी

आॅनलाईन लोकमतरहिमतपूर : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने झालेल्या रंगतदार लढतीमध्ये हरियानाच्या पै.विनोदकुमार याने पुण्याच्या पै. विष्णू खोसे याचा गुणांवर पराभव करीत कुस्ती मैदान मारले. तो एक लाख रुपये बक्षीसासह मानाच्या चषकाचा मानकरी ठरला.रहिमतपूर येथील पद्माभूषण डॉ. वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि स्व.पै.गुलाबराव माने यांच्या स्मरणार्थ रहिमतपूर नगरपरिषद मैदानावर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले होते. प्रारंभी नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष बेदील माने, यशवंत हाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संस्था सचिव शिवीजीराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे जिल्हा सरचिटणीस संभाजीराव गायकवाड, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष पै. साहेबराव पवार, महाराष्ट्र केसरी पै. धनाजी फडतरे, उपमहाराष्ट्र केसरी पै. बाळू पडघम, पै. चंद्रकांत सूळ, पै. आबा सूळ, पै.संदीप साळुंखे, पै. दिलीप पवार, यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. पै. विनोदकुमार आणि पै. विष्णू खोसे या तुल्यबळ मल्लांमध्ये तब्बल तेहतीस मिनीटे कुस्ती रंगली. शेवटी पंचांनी गुणांवर विजयी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पै. विनोदकुमारने गुण मिळवत पै. खोसे चा पराभव केला. लक्षवेधी लढतीमधील दुसऱ्या क्रमांकाची पै. अमोल फडतरे विरुध्द पै. गोकुळ आवारे यांच्यामधील कुस्तीत पै. गोकुळ आवारे याने पै. अमोल फडतरे ला आस्मान दाखवून एक लाख रुपयांचे बक्षीस मिळविले. त्याचबरोबर रोमहर्षक लढतीमध्ये पै. संदीप काळे याने पै. पांडुरंग मांडवे (मोठा) यांचा पराभव केला. पै. पांडुरंग मांडवे (छोटा) याने पै. तात्या करे याला आस्मान दाखविले. पै. रवि करे याने पै. ब्रिजेश ठकराल याचा पराभव केला. पै. शरद पवार याने पै. राहुल लवटे याला चितपट केले.