शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कठडे रंगविले; रस्त्यांचं काय?

By admin | Updated: December 26, 2014 00:21 IST

यात्रेचा मार्ग बिकट : वाई-मांढरदेव रस्त्याची दुरवस्था

मांढरदेव : मांढरदेव, ता. वाई येथील मांढरदेवहून वाईकडे जाणाऱ्या रस्त्याची मांढरदेव ते कोचळेवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भाविकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.मांढरदेव येथील श्री काळूबाईची यात्रा अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे मांढरदेवला येणाऱ्या भाविकांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. यात्रेच्या संपूर्ण महिनाभर भाविक मांढरदेव येथे येत असतात. मांढरदेवला येणारे भाविक वाई व भोर मार्गे मांढरदेवला येतात. हे दोन्ही मार्ग कोचळेवाडी येथे एकत्र येतात. व तेथून चार किलोमीटर अंतरावर ही वाहने प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता सतत वर्दळीचा असतो. वाहनांची संख्या जास्त असल्याने हा रस्ता उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडून खडी रस्त्यावर आली आहे. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित विभागाने मांढरदेव ते कोचळेवाडी दरम्यानच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी नागरिक, वाहनधारक व भाविकांमधून होत आहे. (वार्ताहर)प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांमध्ये नाराजीदरवर्षी यात्राजवळ येताच संबंधित विभागाकडून रस्त्याची डागडुजी होते. मात्र, चालूवर्षी यात्राजवळ येऊनही संबंधित विभाग सुस्त आहे. रस्त्याचे कठडे रंगविले आहेत. मात्र, वाहतुकीचा मुख्य रस्ताच खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.