शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

अनाहूत पाहुण्यांचे हात रिकामेच!

By admin | Updated: October 23, 2014 00:02 IST

पक्षप्रवेश पचनी नाहीच : भाजपच्या बहुतांश उमेदवारांचे मनसुबे मिळाले धुळीस

नितीन काळेल - सातारा  ‘सत्ता’ अशी बाब आहे की, घराघरांत भांडणे लावते. पक्षबदल तर दुरचीच गोष्ट. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीतही अनेकांनी आमदारकीसाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या; पण मतदारांनी त्यांचे सर्व मनसुबे धुळीस मिळविले. या निवडणुकीत सर्वात अधिक करून भाजपात जाणाऱ्यांचाच कल अधिक होता. पण, त्यांचे ‘कमळ’ मात्र कोठेही फुलले नाही. दोघा मातब्बरांनी ‘धनुष्यबाण’ हातात घेतला; पण नेम मात्र बसलाच नाही, अशी स्थिती झाली.राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकत्र नांदत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा व महायुतीचा काडीमोड झाल्यानंतर चौरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आतापर्यंत दुरंगी-तिरंगी लढती होणाऱ्या ठिकाणी चौरंगी तसेच ‘मनसे’मुळे पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांना आमदारकीचे वेध लागले. काही पक्षांना तर अनेक मतदारसंघात स्ट्राँग उमेदवार मिळत नव्हते. अशा वेळी आयात उमेदवारांवर भर देण्यात आला. पक्षांनीही त्यांना त्यांची पार्श्वभूमी विचारत न घेता उमेदवारी बहाल केली. अशा अनेक आयारामांना राज्यातील जनतेने साफ नाकारले आहे. अशीच स्थिती सातारा जिल्ह्यातही दिसून आली. मात्र, या दलबदलूंनाही साथ मिळाली नाही.जिल्ह्यातील सातारा मतदारसंघातील व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी भाजपात प्रवेश केला. पूर्वी त्यांचा काँग्रेस ते शिवसेना असा प्रवास राहिला आहे. वाई मतदारसंघातील व महाबळेश्वरचे नगरसेवक ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. एम. बावळेकर यांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. शिवेसेनेचा एकेकाळी जिल्हाप्रमुख भूषविलेले व लोकसभेला बंडखोरी करून उभा राहिलेले पुरुषोत्तम जाधव यांनी ‘नमो-नमो’चा जयघोष धरला. फलटणमध्ये महायुतीत मतदारसंघ ‘स्वाभिमानी’ला जाईल, या हेतूने दिंगबर आगवणे यांनी धुमधडाक्यात काँग्रेसमधून बाहेर उडी मारली. पण, आघाडी आणि युती तुटल्याने त्यांनी परत गृहप्रवेश केला. फलटणमधीलच व जिल्हा परिषदचे माजी सदस्य पोपटराव काकडे यांनीही हात सोडून ‘स्वाभिमानी’ला जवळ केले. माणमध्ये काँग्रेसच्या शेखर गोरेंनी ‘कपबशी’ हातात घेतली. रणजितसिंह देशमुख यांनीही बदलत्या वातावरणात आपल्या ‘हातात’ धनुष्यबाण घेतला. दुसरीकडे डॉ. अतुल भोसले यांनी पाच वर्षांत दोनवेळा पक्ष बदलला. २००९ रोजी कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीकडून पराभव पाहिल्यानंतर ‘हात’ धरला. या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कऱ्हाड दक्षिणमधून हातात ‘कमळ’ घेतले. अशा घडामोडी घडल्या; पण त्यांना यश मात्र मिळालेच नाही. या निवडणुकीत मात्र तिघांना आपापल्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेण्यात यश आले आहे. मात्र, त्यांचा पराभव हा मोठ्या मताधिक्याने झाला, हेही विसरता येणार नाही. सातारा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांना ४७ हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले. फलटणमध्ये दीपक चव्हाण यांच्याकडून आगवणे यांना ३३ हजारांनी मात खावी लागली. माणमध्ये पुन्हा ‘जय हो’चाच नारा झाला. जयकुमार गोरे यांनी आपल्या लहान भावाला सुमारे २३ हजार मतांनी हरविले. रणजितसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर राहिले. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले हे पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान देत होते. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. वाईत पुरुषोत्तम जाधव व बावळेकर हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. अटकळच राहिली... लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात कोठेही मोदी लाट दिसली नाही. आताही या निवडणुकीत भाजपची हवा निर्माण होऊन एखादी तरी जागा निवडून येईल, अशी भाजपकडून अटकळ बांधली जात होती; पण ती अटकळच राहिली. शिवसेनेनेही माणमधून रणजितसिंह देशमुख यांच्या हातात ‘धनुष्यबाण’ दिला. पण, तो त्यांना पेललाच नाही. देशमुख फक्त राजकीय हवा करण्यात यशस्वी ठरले.