शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

‘हाताची बोटे’ वेगवेगळी : घड्याळालाही बसेना लवकर ‘चावी’...

By admin | Updated: October 2, 2014 22:25 IST

आघाडी फुटली; नेतेमंडळी विखुरली

नितीन काळेल - सातारा  --‘सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही. त्यासाठी अनेक कुटुंबातही कलह पाहिला आहे. राजकारणातून सत्ता मिळवायची झाले तर एकाच घरातील परस्पर पक्षातून लढणारेही आपण पाहिले आहेत. असेच काहीसे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत असून, आघाटी फुटल्यानंतर यावेळी निवडणुकीत ‘हाता’ची बोटे वेगवेगळी दिसत आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसला सोडून अनेकांनी दुसरा घरोबा केला आहे. असे प्रथमच दिसत आहे. दुसरीकडे घड्याळालाही ‘चावी’ बसत नसल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या काळी निवडणुका म्हटले की कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या लढविल्या जात. मोजकेच उमेदवार व थोडेच पक्ष असत. अलीकडच्या काळात राजकीय पक्षांची संख्या वाढली, तसेच निवडणुकीत उतरणाऱ्यांचेही प्रमाण वाढले. अतिमहत्त्वकांक्षा अनेकांना अशा पदांकडे घेऊन जाऊ लागली. त्यामुळे आताच्या निवडणुकांना वेगळेच स्वरूप येऊ लागले आहे. राज्यात अनेक वर्षे आघाडी आणि युती कार्यरत होती; पण त्यांच्यातही अधिक महत्त्वकांक्षेमुळे फाटाफूट झाली. त्यामुळे प्रत्येकजण आता आपापले बळ दाखवू पाहत आहे. परिणामी राज्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात तोडफोडी आणि जोडाजोडी झाली आहे. अनेक पक्षांनाही काही ठिकाणी सक्षम उमेदवार मिळाले नाहीत, असेही चित्र आहे. अशा या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही निवडणुकीमुळे बरीच उलथापालथ झालेली आहे. अधिक करून काँग्रेसकडे ती आहे. आतापर्यंत एकसंध (दोन गट असतानाही) असलेल्या काँग्रेसचे बरेच शिलेदार इकडून तिकडे गेले आहेत. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत निष्ठावंत राहिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत असणारेही अपक्ष उभे राहून स्वपक्षाला एकप्रकारे आव्हान देत आहेत. पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. येथून अनेक वर्षे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. मागील निवडणूक कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचा डॉ. अतुल भोसले हे भाजपमध्ये जाऊन कऱ्हाड दक्षिणमधून लढत आहेत. महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनीही आतात ‘हातात’ धनुष्यबाण घेतला आहे. ते वाई मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी ऐनवेळी हात सोडला आणि घड्याळाला चावी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना पाठिंबा दिला आहे. १९९५ मध्ये युतीच्या लाटेत तत्कालीन जावळी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार सदाशिव सपकाळ हे मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये आले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना उमेदवारी मात्र मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज माघारी घेतला. सध्या ते तटस्थच आहेत. दुसरीकडे माण तालुक्यातील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी माणमधून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. पक्षाने सदाशिवराव पोळ यांना दिली आहे. देसाई यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणुकीत रंगत आणली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शेवटपर्यंत विनवण्या करण्यात आल्या; पण पेटून उठलेल्या देसाईंची चावी काही घड्याळाला बसलीच नाही. कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे हेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिंगणात उतरले आहेत. आगामी काळात प्रचाराच्या फैरी आणि आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळले जाणार आहे.जावळी-महाबळेश्वरमध्यही स्थित्यंतर...जावळी तालुक्यात सदाशिव सपकाळ होते तेव्हा काँग्रेसची ताकद दखल घेण्याइतपत तरी होती. पण, त्यांच्या भाजप प्रवेशानंतर ताकद क्षीण झाली आहे. तेथे सातारा-जावळी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला पदाधिकारी व कार्यकर्ते मिळविताना अनेक समस्या येणार आहेत. महाबळेश्वर येथील व जुने काँग्रेसचे नेते बावळेकर हे सेनेत गेल्याने तेथेही हाताची ताकद कमी झाली आहे. माणमधील काँग्रेसचे विश्वंभर बाबर व सहकारी निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हेही महत्त्वाचे आहे. तसेच येथील काँग्रेसचे वाघोजीराव पोळ यांनी पाठीमागेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.