शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात ‘हात-घड्याळ’ आघाडी निश्चित!

By admin | Updated: January 28, 2017 22:31 IST

दोन्ही काँग्रेस अनुकूल : जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी व्यूहरचना; घोषणेवर शिक्कामोर्तब बाकी -- सुपर व्होट

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्याची सध्याची राजकीय अस्थिरता पाहता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसचे स्थानिक नेते आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यात आजपावेतो हस्ते परहस्ते निरोपांची देवाणघेवाणही झाली आहे. शनिवारी साताऱ्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही याला ग्रीन सिग्नल दिल्याचे वृत्त असून, आता आघाडीच्या घोषणेवर शिक्कामोर्तब होणेच बाकी असल्याची चर्चा दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.कऱ्हाड तालुक्यात दक्षिण आणि उत्तर असे विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दक्षिणचे नेतृत्व करीत आहेत.तर उत्तरेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सध्या पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी त्याला माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाचा टेकू आहे. आज तालुक्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाल्याने पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल हे निश्चित सांगता येत नाही. राज्यात आणि देशात सत्ता असणाऱ्या भाजपने कऱ्हाड तालुक्यात चांगलीच डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. कऱ्हाड पालिका निवडणुकीतही भाजपने नगराध्यक्ष पदाची जागा जिंकून आपला करिष्मा दाखवून दिला आहे. होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतही स्वबळाचा नारा देत कमळ फुलविण्याचा इरादा व्यक्त केल्याने अनेकांनी त्याची धास्ती घेतली आहे. उंडाळकर-भोसले यांचे मैत्रिपर्व संपले असले तरी मोहिते-भोसलेंच्या मनोमिलनाची हवा वाहत असल्याने पृथ्वीराज चव्हाण गटही बराच बॅकफूटला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी कऱ्हाड तालुका विकास आघाडीची घोषणा करीत कऱ्हाड दक्षिणबरोबरच कऱ्हाड उत्तरेतही चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. कऱ्हाड नगरपलिकेतील सत्ता गमावलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही उत्तरेत दमछाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या साऱ्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना हातात हात घालण्याची ही योग्य वेळ वाटत होती; पण पक्षादेशाचं काय, हा खरा प्रश्न होता. (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्र्यांशी तुम्हीच बोला ! : रामराजेंची सूचनासातारा : अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर-पाटील यांच्यावरच राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी दुपारी अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीला रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजेश पाटील-वाठारकर, अ‍ॅड. राजाभाऊ उंडाळकर-पाटील यांची उपस्थिती होती. ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी का?,’ अशी इच्छा अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केली. त्यावर ‘त्यांची इच्छा असेल तर चर्चा करायला हवी, तुम्ही स्वत:च त्यांच्याशी याबाबत बोला,’ अशी सूचना रामराजेंनी त्यांना केली. दरम्यान, या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणासंदर्भात सखोल चर्चा झाली. सकाळी साडेअकरा वाजता बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल तासभर चर्चा सुरू होती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्ह्यातील ६४ गट व १२८ गणांसाठी प्रत्येकी तीन नावे निवडण्यात आली आहेत, त्याची यादी या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. या यादीतील प्रत्येकी दोन नावांची निश्चित करण्यात यावी, अशी सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे. याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.घडामोडींकडे लक्षमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना समविचारी पक्षांना बरोबर घेणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शनिवारी साताऱ्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही कऱ्हाड तालुक्यात आघाडी करण्याबाबत दोन ज्येष्ठ नेत्यांनी अनुकूलता दाखविली असून, ‘रेठरेकर दादा’ अन् ‘उंडाळकर भाऊ’ यांच्यावर त्याबाबतची जबाबदारी टाकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे आता घडामोडींकडे लक्ष लागले आहे.