शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामावर पडणार हातोडा

By admin | Updated: July 5, 2014 00:46 IST

मलकापूर नगरपंचायत : १५ आॅगस्टपूर्वी कारवाई

मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार नगरअभियंत्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणाअंती निदर्शनास आलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर १५ आॅगस्टपूर्वी कारवाई करावी. संबंधित मिळकतधारक किंवा बांधकाम व्यावसायिकांनी न काढल्यास ते बांधकाम पाडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ही कारवाई करण्यात नगर अभियंत्यांनी कसूर केल्यास त्यांची वेतनवाढ थांबविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा खिलारे होत्या. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी हेमंत निकम, सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीच्या आजच्या सभेत विषयपत्रिकेवरील ३३ विषय व ऐनवेळच्या दोन विषयांसह ३५ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विषय क्रमांक ३१ हा विनापरवाना बांधकामाचा आढावा घेणे चर्चेसाठी घेण्यात आला. नगर अभियंत्यांनी प्रथमदर्शनी विनापरवाना बांधकामधारकांना तीन-तीन नोटिसा देऊनही संबंधित सात जणांनी बांधकामे सुरूच ठेवली असल्याचा अहवाल दिला. त्यावर उपनगराध्यक्ष शिंदे यांनी अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे सर्वाधिकार नगरअभियंत्यांना द्यावेत, अशी सूचना मांडली. त्याला राजेंद्र यादव अनुमोदन दिले. त्यानंतर शिंदे यांनी १५ आॅगस्टपूर्वी कायदेशीर कारवाई करून संबंधित बांधकामे पाडण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. कोणताही संबंध नसताना विनाकारण बदनामी होते. ही कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्व नगरसेवकांनी व्यक्त केले.त्याचबरोबर विषयनंबर २६ जिल्हा परिषद शाळांत गणवेश वाटपाचा विषय चर्चेत घेतला. हणमंत जाधव यांनी शाळांचा दर्जा खालावला असून, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याची सूचना मांडली. त्यावर समिती स्थापन करून वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सर्व शिक्षकांची बैठक बोलावण्यात आली. रस्ते, स्ट्रीटलाईटचे गाळे टाकणे, बगीचे विकसित करणे या कामांना मंजूर दिली. (प्रतिनिधी)