शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आधे इधर, आधे उधर... बाकी किधर?

By admin | Updated: July 19, 2016 00:21 IST

सातारा वाहतूक शाखेची फाळणी : ‘सांगा क्रेन कोणाची?’ प्रश्नाचं उत्तर मिळेना; दोन ठाण्यांच्या वादात गाडी पडली कोनाड्यात!

सातारा : जिल्ह्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहरातील वाहतूक शाखेची फाळणी करून शाहूपुरी अन् शहर पोलिस ठाण्यात कर्मचारी वर्ग करण्याचा फतवा निघाला खरा; मात्र ‘रोजची कमाई’ करून देणाऱ्या दोन ‘क्रेन’ कोणाच्या ताब्यात राहणार, या मुद्द्यावरून भलतेच त्रांगडे निर्माण झाले आहे. या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने सोमवारी मोटारसायकली ओढून आणणारी क्रेन दिवसभर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरच पडून होती. त्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर... बाकी किधर?’ असा प्रश्न पोलिस कर्मचारीच एकमेकांना विचारत आहेत. नूतन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्याचा ‘चार्ज’ घेतल्यापासून अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातलाच एक म्हणजे सातारा शहर वाहतूक शाखा, सिटी पोलिस व शाहूपुरी पोलिस ठाण्यात वर्ग करणे. या निर्णयामुळे शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘आपले स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेतले जाते की काय?’ या धास्तीने अनेक कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे हे महिन्यापूर्वी दुचाकीस्वाराच्या धडकेत जखमी झाले होते. उपचारासाठी ते वैद्यकीय रजेवर होते. नूतन पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वागतालाही ते येऊ शकले नव्हते. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांचा ‘दांडगा अनुभव’ लक्षात घेता वाहतूक शाखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्यातच वर्ग करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला गेला. मात्र, शहरात शाहूपुरी पोलिस ठाणेही कार्यरत असल्यामुळे वाहतूक शाखेची विभागणी करावी लागली आहे. सध्या वाहतूक शाखेत जवळपास ५८ पोलिस कर्मचारी असून, त्यापैकी ४० जण शहर पोलिस ठाण्यात तर बाकीचे १८ शाहूपुरीकडे पाठविण्याचा निर्णय झाला आहे. रजेवर असलेले सुरेश घाडगेही कदाचित शहर पोलिस ठाण्याकडेच वर्ग होतील. वाहतूक शाखेच्या फाळणीच्या निर्णयाला दोन दिवस उलटले तरी अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. दोन दिवसांपासून ‘ड्यूटीवरचे लाडके काम’ आटोपून वाहतूक कर्मचारी संध्याकाळी वाहतूक शाखेतच येत आहेत. प्रत्यक्ष कार्यवाहीचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) आता गाडी उचलल्यानंतर दोन ठिकाणी पळापळसध्या वाहतूक शाखेकडे असलेल्या खासगी तत्त्वावरील दोन्हीही क्रेन शहर पोलिस ठाण्याकडे ‘कामाला’ लावण्याचा हक्क ‘सिटी कारभाऱ्यांनी’ दाखविला असला तरी शाहूपुरी पोलिस ठाण्याने एका क्रेनची मागणी केली आहे. त्यामुळे या खासगी क्रेन नेमक्या कुणाच्या ताब्यात द्याव्यात, याचा पेच काही वरिष्ठांकडून सुटलेला नाही. दरम्यान, बोगदा-राजवाडा-मोतीचौक-राधिका चौक ते वाढेफाटा याच्या पश्चिम-उत्तरेकडे असणारा परिसर शाहूपुरीच्या अखत्यारित असल्याने येथे उचलल्या गेलेल्या दुचाकी शाहूपुरी पोलिस ठाण्यातच मिळणार आहेत. बाकी ठिकाणच्या दुचाकी मालकांना शहर पोलिस ठाण्याकडे जावे लागणार आहे. ज्या सर्वसामान्य सातारकरांना दोन पोलिस ठाण्यातील हद्दीचा गुंता सोडवता येणार नाही, त्या बिचाऱ्यांना मात्र आपली दुचाकी शोधण्यासाठी दोन्ही ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार आहेत, हे मात्र नक्की.