आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात वित्त आयोगाचे लाखो रुपये खर्चून सांडपाणी वाहून जाण्यासाठी बंदिस्त गटार योजना राबवत असताना पावसाळ्यात पावसाचे पडणारे पाणी गटारात सोडले नसल्याने प्रत्येक गावात रस्त्यावर छोटे-ओढे तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम तालुक्यात केंद्र शासनाने थेट ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या निधी दिल्याने ग्रामपंचायती शिक्षण, आरोग्य आदी भौतिक सुविधांवर खर्च करण्याऐवजी स्वच्छतेच्या नावाखाली तीन वर्षांत पहिले गटार बांधकाम दगड, वीट, सिमेंट त्यानंतर कमी व्यासाच्या सिमेंट पाईप आता जादा व्यासाच्या सिमेंट पाईप टाकून बंदिस्त गटार योजना राबविताना चढ-उतारांची पाहणी करता जेसीबीने चरी काढून त्यामध्ये सिमेंट पाईप टाकून एका रात्रीत दोनशे ते तीनशे मीटरचे काम पूर्ण होत असल्याचे चित्र गावोगावी दिसत आहे.
गावातून बंदिस्त गटाराची कामे करताना पावसाचे पडणारे पाणी चेंबरद्वारे गटारात समाविष्ट करून न घेतल्याने पावसाचे पडणारे पाणी वाहून एकत्र येऊन छोटे-ओढे तयार होत आहेत. कारण गावागावात सिमेंट रस्ते झाल्यामुळे पाणी मुरण्यास जागा नसल्याने पाणी घरात शिरण्याचे प्रकार होत आहे तर काही गावांना उतार एका बाजूला असल्याने सर्व पाणी एकत्र येऊन मोठा ओढा तयार होऊन रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र दिसत आहे. तरी संबंधित विभागाने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत ते पाणी गटारात समाविष्ट करण्याची मागणी होत आहे.
(कोट..)
गावोगावी बंदिस्त गटाराची कामे करताना सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे; पण पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहून ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांना होणारा त्रास थांबवावा.
- हणमंत बासर, सातारा उपाध्यक्ष, ग्राहक समिती, शिवसेना
०६आदर्की
फोटो : आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथे पावसाचे पाणी गटारात समाविष्ट न केल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)