फलटण : फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर सोमवारी दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
निखिल सतीश कदम (वय २६, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निखिल कदम हा चारचाकीमधून (क्र. एमएच ११सीजी ४८४०) गुटखा वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून ४,९५,००० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस नाईक सर्जेराव सूळ, विक्रांत लावंड, नितीन चतूर, नितीन भोसले, सुजित मेंगावडे यांनी केली.