शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांसमोर राडा !

By admin | Updated: March 3, 2015 00:27 IST

परस्परविरोधी तक्रारी : दिलीप येळगावकर, राजेंद्र चोरगे यांची गुन्ह्यात नावे

सातारा : संस्थांतर्गत कलहातून विद्यार्थ्यांसमोरच मारहाण, शिवीगाळ, दमदाटीचा प्रकार शाहूनगर-गोडोली येथील गुरुकुल स्कूलमध्ये सोमवारी घडला. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. एका फिर्यादीत मारहाण करणाऱ्यांमध्ये माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, येळगावकर यांनीही आपल्याला मारहाण झाल्याचे म्हटले आहे; मात्र त्यांनी यासंदर्भात तक्रार दिली नाही.गुरुकुल प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला नंदकुमार वेल्हाळ (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्या केबिनमध्ये असताना सचिन गरगटे, दिलीप येळगावकर त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि क्लार्क सायली केंडे व वासंती हिरवे यांना बाहेर जाण्यासाठी दमदाटी केली. ‘मी तुम्हाला ओळखत नाही,’ असे सांगून वेल्हाळ यांनी या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले. तेवढ्यात अनोळखी सात-आठ व्यक्ती आत आल्या. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी वेल्हाळ, केंडे, हिरवे यांच्यासह शिपाई उषा बाचल, सुवर्णा मोरे, केशर साळुंखे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली व शाळेबाहेर हाकलून दिले. नंतर गरगटे, येळगावकर व इतर लोक माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीत गेले. गेटवर गाडी लावून गेटला कुलूप लावू लागले. शाळेचे जनसंपर्क अधिकारी फरांदे, शिपाई संजय केंडे, वॉचमन मोकाशी यांनी विरोध केला असता गरगटे, येळगावकर व इतरांनी त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका लीना संदीप जाधव यांच्याकडे जाऊन त्यांनी आणलेल्या पत्रावर सही करण्यास सांगितले. जाधव यांनी विरोध केल्याने गरगटे, येळगावकर यांनी फरांदे यांना मारहाण करून वेल्हाळ यांना धक्काबुक्की केली.यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे तेथे आले आणि त्यांनी गरगटे, येळगावकर व इतरांना ‘शाळेत मुले आहेत, तुम्ही बाहेर जा’ असे सांगितले, परंतु हे सर्वजण तेथेच थांबले. त्यानंतर पोलीस तेथे आले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले.(आणखी वृत्त २ वर)