शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या संघटनेत चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच!

By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक : जागावाटपावरच ठरणार कोण-कोणाबरोबर असणार

कुडाळ : प्राथमिक शिक्षक बँकेत दर पाच वर्षांनी सत्तांतर घडत असते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. गत पंचवार्षिक निवडणूकीत शिक्षक समितीने संघाच्या ताब्यातून सत्ता मिळविली होती. त्याला संघातील वाद हे मुख्य कारण होते. यावेळी हा वाद समितीच्या पथ्यावर पडू नये यासाठी शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघ संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाने एकत्र येवून ही निवडणूक लढवावी अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाटील-थोरात गटात चर्चेत गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, समितीदेखील सत्ता मिळविण्यासाठी पाटील गटाला तसेच दोंदे गटाला बरोबर घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जागावाटपावरच कोण कोणाबरोबर जाणार हे ठरणार आहे.माजी आमदार शिवाजी पाटील प्रणित शिक्षक संघाने कऱ्हाड-पाटण शिक्षक सोसायटीत शिक्षक समितीबरोबर निवडणूक लढवून संभाजी थोरात गटाला पराभूत केले. तर शिक्षक बँकेतही अशी युती होणार अशी चिन्हे दिसत आहेत. जर समिती पाटील गटाबरोबर एकत्र येवून लढली तर संभाजीराव थोरात प्रणित शिक्षक संघाला सत्ता मिळविणे कठीण आहे. घटनादुरूस्तीमुळे बँकेचे संचालक कमी झालेले आहेत. तर गटरचना देखील बदलली आहे. गटरचना करताना समितीने आपल्याला सुरक्षित केले असले तरीही गत पंचवार्षीक निवडणूकीतील मतांची आकडेवारी पाहता संघातील दोन्ही गट एकत्र आल्यास समितीचे सत्तेचे मनसुबे धुळीला मिळतील. त्यामुळे शिक्षक समिती ही पाटील गटाला बरोबर घेण्यासाठी अधिक आग्रही आहे. तर थोरात प्रणित संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मुळीक हे पाटील गटाशी चर्चा करून एकत्र लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शिवाजी पाटील प्रणित संघ हा सत्तेच्या समिकरणात महत्त्वचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे माजी आमदार शिवाजीराव पाटील प्रणित संघ हा आपल्याला जागा अधिक मिळाव्यात यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शेवटी जागा वाटपावरच चर्चेच हे गुऱ्हाड थांबणार आहे. (प्रतिनिधी)माजी आमदार शिवाजी पाटील प्रणित संघ सत्तेत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आमच्या संघटनेला जो अधिक जागा देईल त्यांच्याबरोबर पाटील प्रणित संघ निवडणूक लढविणार आहे.-तुकाराम कदम, राज्य कोषाध्यक्ष, पाटील प्रणित संघसंघाची ताकद जिल्ह्यात मोठी आहे. संघात दोन गट असले तरीदेखील संघटनेत काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये कोणतीही द्वेश भावना नसल्यामुळे दोन्ही संघ एकत्र लढणार हे निश्चित आहे.-मच्छिंद्र मुळीक, जिल्हाध्यक्ष थोरात प्रणित संघदोंदे गट आतापर्यंत ज्या संघटनेच्या बाजुने राहिला आहे. त्या गटाची सत्ता बँकेवर आली आहे. त्यामुळे जो-कोणी आम्हाला चांगली वागणूक देवून योग्य जागा देईल त्यांच्याबरोबर दोंदे गट राहील.-दीपक भुजबळ, अखिल भारतीय शिक्षक संघ जिल्हाध्यक्षकिमान दोन जागा बिनविरोध होण्याची अपेक्षा... शिक्षक बँकेसाठी पाटील प्रणित संघ, थोरात प्रणित संघ, शिक्षक समिती, दोंदे गट या सर्व शिक्षक संघटनांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. मात्र वेळ, पैसा याची बचत व्हावी या उद्देशाने सर्व संघटनांनी किमान एक विचारावर एकत्र येवून दोन जागा तरी बिनविरोध करून एक चांगली सुरूवात करावी, अशी घोषणा सर्वसामान्य सभासदांमधून व्यक्त होत आहे.