शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत घेऊन गुरुजींचा डोंगर दऱ्यातील प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:40 IST

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अंगाचा थरकाप उडविणारे निर्मनुष्य जंगल, झोंबणारा पाऊस, दहा फुटांवरही नीट दिसू ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : अंगाचा थरकाप उडविणारे निर्मनुष्य जंगल, झोंबणारा पाऊस, दहा फुटांवरही नीट दिसू शकणार नाही असं धुकं आणि अशा थंडी वाºयातही घाम काढणारी डोंगराची चढण, रोज सुमारे २ तासांचा डोंगर चढून-उतरून, गुरुजी सातारा-पिसाडी (ता. जावळी) हा प्रवास करतात.अथांग शिवसागर जलाशय, भोवती उंचच उंच डोंगररांगा, त्यातून जाणाºया लालमातीच्या वाटा आणि या वाटा तुडवत परिसरातून शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे चित्र साहित्यामधील प्रवास वर्णनामध्ये लोभस वाटू शकेल, तरी ते सुखावणारे निश्चित नाही. पिसाडी, पर्वत, गाडवली, ही जावळी-महाबळेश्वर तालुक्यांतील काही गावे. कास, तांबी, जुंगटीमार्गे कात्रेवाडीतून सुमारे हजार फुटांचा डोंगरकडा उतरून पिसाडीत जावे लागते.याठिकाणी जाण्यासाठी शिक्षकाला जीवघेण्या दिव्यातून जावे लागते. पिसाडीला शिवसागरातूनही जाता येते. मात्र सरकारी बोट दुपारी बोमणोलीतून निघते. या बोटीची वेळ शाळेसाठी गैरसोयीची आहे. शिवसागर जलाशयाजवळ डोंगर खरोखरच्या पर्वतासारखा उंच आहे. महाबळेश्वर तालुक्यात हा भाग मोडतो. बामणोलीतून लाँचने वाघावळेत जायचं. त्यानंतर सुमारे दीड तास पायी डोंगर चढून गेल्यावर पर्वतच्या शाळेत शिक्षक पोहोचतो.जीवावर उदार होऊन शिक्षकांचा प्रवासकात्रेवाडीजवळच्या जंगलात सहा महिन्यांपूर्वी तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध जायबंद झाला. बचावासाठी झाडावर चढल्यानंतरही अस्वलांनी नख्यांनी बोचकरून त्यांच्या पायाचे लचके तोडले होते. घरातून बाहेर पडलेला माणूस पुन्हा घरी येत नाही, तोपर्यंत लोकांच्या जीवात जीव नसतो, ही स्थिती जशी पिसाडीच्या शिक्षकांची तशीच ती पर्वतच्या गुरुजींची आहे. कोसळता पाऊस आणि वाºयाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गुरुजी स्वत:च्या जीवावर उदार होऊन रोजच्या या जंगलातून एकट्याने प्रवास करतात, हे विशेष!