शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना एसटीत बसवतात गुरुजी!

By admin | Updated: June 24, 2016 00:41 IST

देऊरचे मुधाई हायस्कूल : परगावच्या प्रत्येक मुलाच्या सुरक्षेसाठी शिक्षकांवर विशेष जबाबदारी-- अशी ही शाळा- जगावेगळी

संजय कदम-- वाठार स्टेशन शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी कोठे जातो, कसा जातो याकडे कोणतीही शाळा विशेष लक्ष देत नाही. अनेक मुलं बसस्थानकात एसटीच्या मागे धावताना पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो; पण याला देऊरचे मुधाई हायस्कूल अपवाद आहे. परगावच्या मुलांना एसटीत सुरक्षितपणे बसविण्याची जणू जबाबदारीच या शाळेने घेतली आहे. यासाठी दररोज एका शिक्षकाची ड्यूटी लावली जात असून, शेवटचा विद्यार्थी एसटीत बसल्याशिवाय गुरुजीही बसस्थानक सोडत नाहीत.देऊर शाळेचा हा प्रयोग २००२ पासून अखंड सुरू आहे. रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या व अपघात यामुळे पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची भेडसावणारी काळजी याचा विचार करून शाळेने देऊरच्या बसस्थानकावर दररोज एका शिक्षकाला वाहतुकीचे नियमन करून विविध मार्गावरील एसटीतून विद्यार्थी पाठविण्याची जबाबदारी सोपविली आहे. देऊरच्या मुधाई हायस्कूलमध्ये व्यवसाय शिक्षण देण्याच्या उद्देशाने या संस्थेने व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. याशिवाय इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे. तसेच शेती,आटर््स, सायन्स, कॉमर्स या विभागांतून शिक्षण दिले जाते. प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे येथे तालुक्याच्या विविध भागांतून विद्यार्थी येतात. यामध्ये फलटण, खंडाळा, सातारा व कोरेगाव तालुक्यांतून १,७५८ विद्यार्थी शिक्षण घेतात. बसस्थानकात वेगवेगळ्या मार्गावर जाणाऱ्या मुलांच्या रांगा बसस्थानकात लावल्या जातात. एसटी आल्यानंतर गोंधळ न घालता मुलं रांगेतून एसटीत चढतात. त्यामुळे कोणालाही धक्काबुक्की नाही. ज्येष्ठ नागरिक, तरुणींना त्रास होत नाही.याशिवाय अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये दहावी ते पदवीपर्यंतच्या ‘कॉफी पकडा, एक हजार मिळवा’ अशी घोषणाच केली आहे. हस्तलिखित निर्मिती, फटाकेमुक्त दिवाळी, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, इको फ्रेंडली होळी, लेझिम, झांज पथक, घर तेथे अभ्यासिका, दत्तक पालक योजना, डॉ. मधुकर ओझर्डे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, किल्ले स्पर्धा घेतली जाते.संस्थापक विश्वस्त प्रा. संभाजीराव कदम व त्यांना साथ देणारे संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील पवार, अध्यक्ष भीमराव कदम, सचिव हणमंतराव कदम, विश्वस्त किसनराव कदम, सर्जेराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, पुरुषोत्तम माने, धनसिंग कदम, देवेंद्र कदम, समीर चव्हाण, अरविंद कदम, रवींद्र कदम, राजेंद्र कदम, दत्तात्रय शिंदे, प्रवीण कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. देऊरच्या मुधाई हायस्कूलने १९५६ पासून गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथे अनेक गुणवंत घडविले आहेत. ग्रामीण भागातील अडचणींवर मार्ग काढत शाळेचा गुणात्मक आलेख चढता राहिला आहे. - विजयसिंह गायकवाड, प्राचार्यशाळा वापरते स्वत:ची वीजमुधाई शिक्षण संस्थेच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाने २०१२-१३ या वर्षात दहा केवी वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून या महाविद्यालयाच्या प्रांगणात २ हायब्रिड युनिट जोडली आहेत. यासाठी २५ लाखांचा खर्च आला. त्यापैकी १५ लाखांचे अनुदान केंद्रातून मिळाले आहे. तर ९ ते १० लाख रुपये संस्थेने खर्च केले आहेत. चार वर्षांत या माध्यमातून जवळपास १.४८ लाखांची वीज बचत करण्यात आली आहे शिवाजी विद्यापीठातील हा बहुदा पहिलाच प्रयोग आहे.