शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गुंड भानुदास धोत्रेसह तिघेजण तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2015 23:37 IST

‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार कारवाई : कऱ्हाडातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात

कऱ्हाड : शहरातील वाढत्या गुन्हेगारी कारवाया व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सल्या चेप्या हल्ला प्रकरणातील गुंड भानुदास धोत्रे याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तर इतर दोघांना सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. कऱ्हाडात गत काही महिन्यांपासून गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. शस्त्रांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याचे व अनेकांकडे बेकाशदेशीर शस्त्र असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चाप लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्यांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या गणेशोत्सवास प्रारंभ झाला असून, त्यातच बकरी ईद सणही जवळ आला आहे. त्यापाठोपाठ इतर सण व उत्सवही येत आहेत. त्यामुळे पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील कायदा, सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी गुंडांच्या हद्दपारीचे सत्र सुरू करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच पोलिसांनी सल्या चेप्या हल्ला प्रकरणातील गुंड भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रांताधिकारी किशोर पवार यांनी ही कारवाई केली. गुंडांच्या कारवाया थोपविण्याबरोबरच घरफोडी व चोरीचे गुन्हे रोखण्यासाठीही पोलिसांनी कंबर कसली आहे. यापूर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सागर संजय शिंदे (रा. कापील) व अविनाश भीमराव सकट (रा. गोळेश्वर, ता. कऱ्हाड) या दोघांनाही सातारा व सांगली जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गुन्हेगारांवर ‘वॉच’शहरातील इतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गुन्हे प्रकटीकरण शाखा ‘वॉच’ ठेवून आहे. तसेच इतर गुंडांवरही हद्दपारीची कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिले आहेत.