शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
4
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
5
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
6
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
7
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
8
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
9
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
10
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
11
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
12
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
13
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
14
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
15
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
16
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
17
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
18
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
19
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
20
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार

गुजरातचे फुगे साताऱ्याच्या रस्त्यांवर!

By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST

चिमुकल्यांमध्ये क्रेझ : पंजाबी कुटुंबांचे क्रेझी मार्केटिंग!

कोंडवे : मार्केटिंगच्या आजच्या युगात वस्तू खपवण्याची कला ज्याच्याकडे असेल, तो काहीही विकू शकतो. त्यात भाषा आणि प्रांताचा कोणताच अडसर येत नाही हेच खरे! गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी उंचच उंच फुगे घेऊन वाहनांच्या गर्दीतून दुडूदुडू पळणारी पावले सगळ्यांनी पाहिली. गुजरातहून आलेल्या या फिरस्त्यांना आता निम्मा सातारा ओळखू लागला आहे.मंगळवारी सकाळी शहरात विशेषत: एसटी स्टॅण्ड परिसरात आपल्या उंचीएवढी उंच फुगे हातात घेऊन धावणारी मुलं अनेकांनी पाहिली. इतका मोठा फुगा म्हणत गर्दीतील अनेकांचे या फुग्याकडे लक्ष जात होते. ज्यांच्या गाडीत लहानगे होते त्यांना तर फुगे घेण्याशिवाय काही पर्यायच उरला नव्हता.सकाळी आठपासून सुरू होणारा यांचा व्यवसाय थेट संध्याकाळी सात वाजता बंद होतो. ही मुलं आणि पालक दुपारचे जेवणही आळीपाळीने करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या शहरात जाणाऱ्या या फिरस्त्यांना साताऱ्याची भुरळ पडली आहे. ‘इथली माणसं मायाळू आहेत. प्रत्येकजण बसवून चहा पाणी विचारतो. मुलांशी अदबीने वागतात. तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलंय. धंदा चांगला असेल तर हे शहर लवकर सोडणार नाही,’ असे जस्मत सांगतात. (प्रतिनिधी)दिवसाकाठी ७००-७५०गुजरात येथील अहमदाबाद पासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘नडियाड’ या गावातून जस्मत सिंग आपल्या कुटुंबासह आले आहेत. सकाळी आठपासून संध्याकाळी पाचपर्यंत कुटुंबातील पाचजण फुगे विकण्याचा व्यवसाय करतात. यातून त्यांची ७००-७५० रुपयांची सरासरी कमाई होते. दुपारच्या वेळेतही अविश्रांत काम केल्यानंतर मिळालेली कमाईही एकत्र करून त्या रकमेतून दोन वेळच्या अन्नाची सोय केली जाते. आपला सगळा संसार एसटी स्टॅण्ड परिसरात एका कोपऱ्यात टाकून हे अख्खं घरदार रस्त्यावर फिरते ते फुगे विकण्यासाठी...!मोबाईल चार्जर देण्याची माणुसकीजग बदलतेय तशी माणसांच्या माणुसकीचे नियमही बदलत चालले आहेत. पूर्वी अन्नदान करणाऱ्याला माणुसकी म्हणायचे तर आता मोबाईल चार्जर देणाऱ्यांमध्ये जस्मतला ‘इन्सानियत’ दिसते. याविषयी ते सांगतात, ‘गावाकडे माझी दोन मुले आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल आहे. आमच्याकडे चार्जर नसल्यामुळे खूप अडचण होती. साताऱ्यातील लोक या बाबतीतपण दिलदार आहेत. कोणालाही थोड्या वेळासाठी चार्जर मागितला तर लोक देतात. कित्येक जणांनी मोबाईल चार्जिंगला लावा आणि तुम्ही निर्धास्त होऊन धंद्याला जावा’.