शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पोळ यांच्या मेळाव्यात गुदगेंची ‘एंन्ट्री’

By admin | Updated: October 1, 2014 01:10 IST

मायणी : मायणी येथे शुक्रवारी काँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना

मायणी : मायणी येथे शुक्रवारी काँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना गुदगे गटाने जाहीर पाठिंबा दिला. त्यानिमित्त आयोजित गुदगे समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरेंद्र गुदगे स्वत: सामील झाले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, तुकाराम तुपे, वडूज बाजार समितीचे सभापती सोमनाथ माळी, प्रा. सदाशिव खाडे, सदाशिव राऊत, शाहिस्तेखान मुलाणी उपस्थित होते.सुरेंद्र गुदगे म्हणाले ‘राजकाणात वरचढ होऊ नये म्हणून आ. गोरे यांनी माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांवर आघात केले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शोभना गुदगे यांना पक्षप्रवेश पद देताना जिल्ह्यातून सर्वांचा पाठिंबा असताना गोरे यांनीच विरोध केला. मायणी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला समर्थक कार्यकर्त्यास माझा पॅनेलविरोधात उमेदवारी टाकून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मार्केट कमिटीमध्ये देखील माझ्या विचाराच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला.हे सर्व सहन केले; मात्र उरमोडीचे पाणी निवडणूक निधीसाठी मातीची बेईमानी करून सांगलीस विकल्याने जनतेशी गद्दारी करणाऱ्यांना यापुढे कदापिही साथ न देण्याचा निश्चय करूनच पोळतात्यांना या निवडणुकीत माझ्या संघटनेने पाठिंबा देण्याचा निश्चय केला.’ राष्ट्रवादीकडून योग्य तो सन्मान दिला जाईल. आजच्या सभेने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणारे कार्यकर्ते ठामपणाने सुरेंद्र गुदगेंच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. सुरेंद्र गुदगेंच्या संघटनेतून किंगमेकरचा किंग होण्याची संधी सुरेंद्र गुदगे यांना यानिमित्ताने मिळणार आहे. माणचे लोकप्रतिनिधी पाणी आणल्याचे नाटक करून निवडणूक स्टंट निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. (वार्ताहर)