शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

.. गडीमान्सांनी बी दारं लावून घेतली!

By admin | Updated: March 29, 2016 00:15 IST

विनयभंगावेळची ‘तिची’ व्यथा : भररस्त्यात ‘तो’ करीत होता पाठलाग

सातारा : ‘बायमान्साचं मी समजू शकते; पन गडीमान्सांनी बी दारं धडाधड लावून घेतली. शेवटी एका बाईला म्हटलं... बाईनं बाईला मदत नाही करायची तर कुनी करायची... मग तिनं लपायला जागा दिली..’विनयभंगाची रीतसर फिर्याद दाखल झाली. ‘त्या’ला अटकही झाली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. ‘ती’ मात्र हा प्रसंग आठवला तरी आसवं गाळते. खरं तर वाईट प्रवृत्तींपासून लेकीला जपण्याचे तिचे दिवस; पण या वयात तिच्यावरच गुरुवारी भीषण प्रसंग ओढवला. दहा घरचं धुणं-भांडी करून संसार चालवणाऱ्या या महिलेला त्या प्रसंगाची आठवण झाल्यावर त्रास होतोच; पण त्याहून अधिक त्रास होतो तो नागरिकांच्या तटस्थपणाचा.कामावर जाताना शुक्रवार पेठेतल्या एका मंदिरात माथा टेकून पुढं जायचं, असा या महिलेचा दिनक्रम. गुरुवारी देवासमोर हात जोडून उभी असताना मागे कुणीतरी असल्याची जाणीव तिला झाली. वळून पाहिलं तर ‘तो’ छोट्या दरवाजाला दोन्ही बाजूंना दोन हात ठेवून वाट अडवून उभा...मनाचा हिय्या करून तिने त्याच्या हाताखालून पळ काढला, तसा त्याने तिचा पाठलाग सुरू केला. भररस्त्यात ती पुढे आणि तो मागे धावत होता. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली... मदतीसाठी; पण लोकांनी मदत करण्याऐवजी धडाधड दारं लावून घ्यायला सुरुवात केली. ‘धट्टीकट्टी गडीमान्सं बी घरात पळत होती,’ असं तिचं म्हणणं. अखेर एका घरात तिला एक महिला दिसली. जिवाच्या आकांतानं ती ओरडली, ‘बाईनं बाईला मदत नाही करायची तर कुनी करायची...’ महिलेनं फाटक उघडून तिला आत घेतलं आणि एका फुलझाडामागे लपवलं. या सगळ्या धावपळीनं ‘तिची’ अवस्था बिकट झालेली. धाप लागली होतीच; शिवाय रक्तदाबाचा त्रास! त्यातच धावताना ती हाती लागत नाही हे पाहून ‘त्याने’ तिला जोरात लाथ मारल्यामुळं प्रचंड वेदना होत होत्या. या महिलेनंही मदत करायला नकार दिला असता, तर मात्र ‘तिची’ धडगत नव्हती! संकटात असलेल्या महिलेला मदत मिळत नाही. हे वास्तव या घटनेमुळे समोर आले असून, त्याचेच शल्य ‘तिला’ अधिक आहे. (प्रतिनिधी)रुग्णालयातच नोंदविला जबाबवेदनेनं तळमळणाऱ्या ‘तिला’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इकडे कुणीतरी फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं होतं. पोलिस ‘त्याला’ घेऊन गेले होते. नंतर पोलिसांनी रुग्णालयातच तिचा जबाब नोंदवून घेतला. ‘ती’ ज्या घरात कामं करते, त्यातल्याच एका सद््गृहस्थाने तिला तक्रार नोंदवायला सांगितलं होतं. अन्यथा हा प्रकार कुणाला समजलाही नसता. ‘सायबांनी खूप मदत केली,’ असं ‘ती’ सांगते.