शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

पालकमंत्र्यांची ‘कोयने’त गोपनीय बैठक

By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST

कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला

कोयनानगर : पालकमंत्री विजय शिवतारे पाटण दौऱ्यावर आले असून, त्यांनी रविवारी सायंकाळी कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटण दौऱ्यावर येणार असल्याने सकाळपासून कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पानसे, कार्यकारी अधिकारी (बांधकाम) उपेंद्र रोकडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र्र मोहिते, कार्यकारी अधिकारी (धरण व्यपवस्थापन) एम. आय. धरणे यांच्यासह प्रकल्पाचे सर्व अधिकारी कार्यरत होते. पालकमंत्री शिवतारे यांनी आ. शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतीस अभिवादन करून साखर कारखान्याची पाहणी केली. सायंकाळी कोयनानगरच्या शासकीय विश्रामगृहावर ते दाखल झाले. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या अखत्यारित कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेतली.आ. शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख जयवंत शेलार, तालुका प्रमुख रवींद्र पाटील, शिवसेना नेते गजानन कदम यांच्यासह कोयना प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या दौऱ्यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनीही त्यांचा सत्कार केला. (वार्ताहर)