शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

पालकमंत्र्यांची गाडी वादाला कारणीभूूत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:27 IST

लाल दिवा कोणाचा? उत्सुकता शिगेला... ..वाद विकोपाला !

सातारा : दीड वर्षापूर्वी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा कॉन्व्हॉय पक्ष कार्यालयात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी भवन गजबजून जात होते. आता मात्र हे वैभव राष्ट्रवादीकडे राहिलेले नाही. राष्ट्रवादी भवनासमोरून जाणाऱ्या इतर वाहनांचा कॉन्व्हॉय पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्यानं कॉन्व्हॉय कुणाचा? याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने गुरुवारी दोन महिला पदाधिकाऱ्यांतील वाद विकोपाला गेला. या वादाला कारण मात्र पक्षातील पद मिळण्याचेच होते. राष्ट्रवादी युवती सेलच्या निवडी झाल्या. या निवडीतील संघर्षामुळेच राष्ट्रवादी पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांत वाद धुमसत होता. या वादाला उफाळून यायला पालकमंत्र्यांच्या वाहनाचे निमित्त झाले. राष्ट्रवादीच्या युवती सेलची बैठक झाली. बैठकीनंतर उपस्थित महिला राष्ट्रवादी भवनातून बाहेर पडत असतानाच पालकमंत्र्यांच्या वाहनांचा कॉन्व्हॉय समोरून गेला. पालकमंत्रीच या वाहनातून गेले असल्याची चर्चा सुरू झाली.यातूनच दोघींमध्ये खडाजंगी झाली. मात्र, मुळात वाद होता तो युवती पदाधिकारी निवडीचा आणि या वादाला तोंड फुटले पालकमंत्र्यांच्या वाहनामुळे. शिवसेनच्या पालकमंत्र्यांची गाडी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरून गेली तरी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये कालवाकालव सुरू होते. हे वास्तव यानिमित्ताने समोर आले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला पदाधिकाऱ्यांतील वाद घडवून आणण्यासाठी पालकमंत्र्यांचे वाहनही पुरेसे असल्याची चर्चा यानिमित्ताने साताऱ्यात सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)बदनामी कशाला?कोणाविषयी काय बोलणे, हा संस्काराचा भाग आहे. पण बोलताना ज्या व्यक्तीचा वादाशी संबंधही नाही, अशा व्यक्तीची बदनामी कशासाठी करायची? सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ न देणे, ही प्रत्येक महिलेची जबाबदारी आहे. पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी याचे भान राखणे आवश्यक आहे.- सुवर्णा पाटील, भाजप, शहराध्यक्षा युवतींनी काय बोध घ्यायचा?युवती बैठकीसाठी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादीच्या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवतीही या बैठकीला हजर होत्या. बैठक संपल्यानंतर काही युवती अभ्यासाला गेल्या; मात्र काहीजणी गर्दीत उभ्या होत्या. याचवेळी वाद सुरू झाल्याने या युवतींनी काय आदर्श घ्यायचा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे, त्याचा अर्थ आपण असभ्य वर्तन करणे, असा नाही. आणि कोणत्याही महिलेने बोलताना अनेकदा विचार करावा. पालकमंत्री मग ते कोणत्याही पक्षाचे असू दे, राष्ट्रवादी पक्षीय कार्यालयापुढे झाले आहे. गुरुवारच्या घटनेने त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी घडवून आणले. दिलेल्या आरक्षणाचा जनहितासाठी वापर आवश्यक आहे. - शारदा जाधव, शिवसेना, महिला जिल्हाध्यक्षासोन्याचे मणी सापडतायत का बघा!राष्ट्रवादी भवनासमोर झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हाणामारीत दोघींचे मंगळसूत्र तुटले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी या आवारात उभ्या असलेल्या एका घोळक्यामध्ये ‘सोन्याचे मणी सापडतायत का बघा,’ अशी चर्चा सुरू होती.