शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री, आमदारांना आत टाका!

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

चार तासानंतर दोन गुन्हे दाखल

सातारा : ‘पालकमंत्री आणि आमदारांना लॉकअपमध्ये टाका. म्हणजे मला ‘ओके’ वाटेल,’ असे मिश्कील व्यक्तव्य करून खासदार उदयनराजे भोसले यांनी अनेकांच्या भुवया उंचाविल्या. त्यांच्या वक्तव्यामुळे पालकमंत्री शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होते शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्याचे. राजकारण असो की, समाजकारण पण ; बुचकळ्यात टाकणाऱ्या वक्तव्यामुळे सातारचे खासदार उदयनराजे भोसले राज्याच्या राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गुरूवारीही असाच भन्नाट किस्सा घडला. उदयनराजे बोलण्यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उदयनराजे डायसच्या ठिकाणी उभे राहून बोलू लागले. ‘मला आश्चर्य वाटतंय. आमदार एवढे पोपटपंची करतायत. येथे जमलेले आयजी, बीजी, डीजी पुढची पदे मला माहिती नाहीत. तुम्ही मला समजून घ्या...’ असे म्हणत उदयनराजेंनी भाषणाची सुरूवात केली. शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजेंकडे बघत उदयनराजे म्हणाले, ‘अहो आयजी, या दोघांना लॉकअपमध्ये टाका म्हणजे मला ओके वाटेल.’ यावर सभागृहामध्ये एकच हशा पिकला.उदयनराजे पुढे म्हणाले, या शाहूपुरी पोलीस ठाण्यामुळे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. माझ्या मित्रांनी या पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांचा सत्कार या ठिकाणी व्हायला पाहिजे. शाहूपुरीवासीयांचे माझ्यावर प्रेम आहे. ‘आय लव्ह यू’ शाहूपुरीकर... असे म्हणून त्यांनी उपस्थिांना जिंकून घेतले. यानंतर त्यांनी आयोजकांना चिमटा काढला. ‘आता इथून जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. या सगळ्यांना आत कोंडून ठेवा, वाटल्यास सभागृहाचे शटर बंद करा, पण जेवण ह्यांच्याकडून (व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांकडे बघत) घ्या.’ अशीही त्यांनी कोपरखळी मारली. उदयनराजे या कार्यक्रमामध्ये गमतीने बोलले असले तरी आयजी आणि पालकमंत्री मात्र अवाक् झाले. उदयनराजे केवळ दोन ते तीन मिनिटे बोलले. पण त्यांनी अख्या सभागृहाला पोट धरून हसायला लावले. कार्यक्रम संपल्यानंतर लोक सभागृहाबाहेर आले. यानंतर उदयनराजेंच्या भाषणाविषयी कुजबुज सुरू झाली. (प्रतिनिधी)चार तासानंतर दोन गुन्हे दाखलपहिल्याच दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा कोणाचा दाखल होतोय , याची अनेकांना उत्सुकता लागली होती. सकाळी साडेअकराला उद्घाटन झाल्यानंतर पोलीस कामाला लागले. दुपारपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, चार वाजता दमदाटीचा पहिला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. अतूल विनोद घोईल (रा. सदर बझार) यांचे शाहू स्टेडीयम येथे कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानामध्ये विजय भोसले, सुरज (किन्हई), अक्षय (रा. कोरेगाव) हे कपडे खरेदीसाठी आले. किमतीवरून त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर तिघांनी बघून घेतो, अशी धमकी देवून पलायन केले. दुसरी घटना राजवाड्यावर घडली. रोहिदास श्रीरंग जगताप (रा. रणदुल्लाबाद, कोरेगाव) यांचा मोबाइल गहाळ झाला. या दोन्ही घटना गुन्ह्यांमध्ये मोडत नाहीत, अदखलपात्र म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस डायरी पहिल्या दिवशी कोरी राहिली.