शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

विकास करा... पण वेळेत मोबदला द्या !

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

मदत लालफितीत : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास विलंब; सहापदरीकरणाचे काम धिम्या गतीने

सातारा : शंभरपैकी जवळजवळ नव्वद खातेदारांचे म्हणणे असते की, विकास करा, रस्ता चांगला बांधा.. पण त्याचे चांगले पैसे आणि लवकर द्या, मात्र प्रशासनाच्या लालफिती कारभारामुळे लोकांपर्यंत हे पैसे पोहोचण्यास तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास विलंब होत असल्यामुळे सहापरदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे बोलले जात आहे.ज्यांची जमीन सहापदीकरणामध्ये गेली आहे, अशा लोकांना जमिनीचा मोबदला देताना प्रत्येकाचा रेडीरेकनर त्या त्या गावाचा ठरलेला असतो. समजा एखाद्याचे शेत बिनशेती असेल तर त्याप्रमाणे त्याला पैसे दिले जातात. तर शेतीचे असेल तर शेतीप्रमाणे पैसे दिले जातात.नॅशनल हायवे अ‍ॅक्ट १९५६ नुसार पहिल्यांदा जर एखाद्या जमिनीमध्ये सर्व्हे करायचा असेल तर ३ सी प्रकाशित करावे लागते. त्याचे राजपत्र होतं. दिल्लीमधून आणि ते ३ सी प्रकाशित झाल्यानंतर मगच सर्व्हेसाठी परवागनी मिळते. हा सर्व्हे करताना कोणालाही बेकायदेशीररीत्या अडथळा करता येत नाही. म्हणजे एखादा म्हणू शकतो, माझ्या शेतात येऊन का मोजणी करताय, पण वास्तविक एका विभागाची मोजणी करायची असेल तर संपूर्ण गट मोजावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्याचे काहीच चालत नाही. प्रशासन दर ठरवेल तो दर घेऊन निमूटपणे स्वत:ची जमीन शासनाच्या स्वाधीन करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरत नसतो. पूर्वी महामार्गाचा विकास करताना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. परंतु ३ सी प्रकाशित केल्यामुळे शेतकऱ्याला अडथळा निर्माण करता येत नाही. त्यामुळे सध्या सहापदरीकरणाचे काम सोपे झाले असले तरी शेतकऱ्यांची मते जाणून घेऊनच काम पूर्णत्वास नेण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)झाडे तोडण्यासाठी दोन कोटी!सहापदरीकरणाचे काम रखडण्यामागे वनविभाग कारणीभूत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणे वनविभागाकडे तब्बल दोन कोटी रुपये भरले आहेत. असे असताना अद्याप वनविभागकडून कसलीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवून घेतल्याशिवाय प्रशासनापुढे गत्यंतर नाही.‘शिवराज’ उड्डाणपुलाचे काम आठ दिवसांत मार्गी लावणारमहामार्ग अधिकाऱ्यांचे शिंदे यांना आश्वासनसातारा : संभाजीनगर ग्रामस्थ व हायवे शेजारच्या सर्व नागरिकांच्या संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या ‘शिवराज भुयारी मार्ग’चा विषय लवकर मार्गी लागणार असून, येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याच्या सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तांत्रिक अडचणींमुळे व काही प्रशासकीय आदेश यामुळे येथील हा विषय लांबणीवर पडला होता; पण सर्व तांत्रिक बाबी आता पूर्ण झाल्या असून, लवकर हे काम सुरू होणार आहे.या संदर्भात येथील नागरिकांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना सर्व माहिती दिली. येथे घडणारे अपघात, वाहतूक गर्दी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ व नागरिक यांना करावे लागणारे क्रॉसिंग हे सर्व विषय महत्त्वाचे आहेत. हायवे अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत काम सुरू होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी भुयारी मार्गाच्या कामासाठी प्रशासकीय पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांना निवेदन दिले.यावेळी प्रवीण शिंगटे, जगदीश महाजन, विद्याधर थोरात, सुजीत चावरे, सागर तरडे, अक्षयकुमार पाटील, हर्षल जगदाळे, सत्यजित चावरे, पै. संतोष बाबर, बापू पाटील, संजय क्षीरसागर, नीलेश कुलकर्णी, गोरख नलावडे, मल्लकमीर काका, ग्रामपंचायत सदस्य, अनिल खराडे, डॉ. पोळ, राजन भिंताडे व संभाजीनगरमधील ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)