फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून वेणुताई चव्हाण यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी चिली (अमेरिका) येथे झालेल्या हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला विजयश्री प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रीय संघातील फलटणच्या ३ विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
वैष्णवी फाळके या विद्यार्थिनीसह ऋतुजा पिसाळ, अक्षता ढेकळे या ३ विद्यार्थिनींचा चिली (अमेरिका) येथील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत विजयश्री खेचून आणलेल्या भारतीय संघात समावेश होता. त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, उपाध्यक्ष बी. एम. मोदी, मानद सचिव सचिन सूर्यवंशी-बेडके, नियामक मंडळ सदस्य सतीश पटवर्धन, सी. एल. पवार, शिवाजीराव बेडके, संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.