शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:38 IST

कऱ्हाड येथे पालिकेनजीक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. दरवर्षी जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ...

कऱ्हाड येथे पालिकेनजीक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. दरवर्षी जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुतळा परिसरात मोठे स्टेज उभारून त्याची सजावट केली जाते. तसेच सायंकाळी मिरवणूकही काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. अनेकांनी पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अभिवादन केले. तसेच माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक डॉ. इंद्रजित गुजर, माजी नगराध्यक्ष फारूख पटवेकर, अशोकराव पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. पालिकेच्यावतीने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीही पुतळ्याला अभिवादन केले.

दरम्यान, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून पालिकेला देण्यात आलेल्या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

फोटो : १४केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, इंद्रजित गुजर, फारूख पटवेकर, अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.