शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोड मजुरांच्या तळावर ‘हिरवीगार सावली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : दिवसभर उन्हातान्हात राबून ऊस तोडणाºया मजुरांच्या तळावर आता हिरवीगार सावली निर्माण करण्याच्या नवा प्रयोग किसन वीर साखर कारखान्याने केला आहे.‘सर्वसामान्य शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली येथील व्यवस्थापनाने नवनवीन प्रकल्प उभारणीबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतली ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : दिवसभर उन्हातान्हात राबून ऊस तोडणाºया मजुरांच्या तळावर आता हिरवीगार सावली निर्माण करण्याच्या नवा प्रयोग किसन वीर साखर कारखान्याने केला आहे.‘सर्वसामान्य शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली येथील व्यवस्थापनाने नवनवीन प्रकल्प उभारणीबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी वृक्ष लागवडीची चळवळ हाती घेतली आहे. हा उपक्रम स्तुत्य व अभिनंदनीय आहे,’ असे प्रतिपादन सिमेन्स इंडिया कंपनीचे एक्झिकेटीव्ह इंजिनिअर महावीर सिंग चव्हाण यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावरील मजूर तळ परिसरात राज्यवृक्ष असलेला तामण जातीच्या ६६ झाडांची लागवड ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’ या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात चव्हाण यांच्या हस्ते आणि कारखान्याचे खातेप्रमुख व विभागप्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवस्थापनाने ऊस तोड मजुरांच्या खोपीतळातील सुमारे १५ एकर परिसरात आतापर्यंत तामण १८७, गुळभेंडी ५५, अर्जुन ८५, पिंपळ ३०, करंज २०, कडुलिंब २० अशी एकूण ३९७ झाडे लावलेली आहेत.चव्हाण म्हणाले, ‘आज औद्योगिकीकरणामुळे हवेत कार्बनडाय आॅक्साईचे प्रमाण वाढलेले आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे वृक्षतोड अमाप होत आहे. ’यावेळी इन्चार्ज सेक्रेटरी एन. एन. काळोखे, चीफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, प्रोडॅक्शन मॅनेजर ए. एस. साळुंखे, इन्चार्ज अ‍ॅग्री मॅनेंजर विठ्ठलराव कदम, डिस्टीलरी मॅनेजर एस. वाय. महिंद, एचआर मॅनेंजर ए. टी. शिंगटे, को-जन मॅनेजर डी. आर. वाघोले, सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे, सिव्हिल इंजिनियर एच. एस. पाटील, परचेस इन्चार्ज राजेंद्र भीमराव भोईटे, जनसंपर्क अधिकारी मेहबूब मदारखान, इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, इन्चार्ज शुगर गोदाम किपर दीपक गाढवे, हेवी व्हेईकल इन्चार्ज राजेंद्र भोईटे, इन्चार्ज स्टोअर किपर आर. एम. मतकर, फलोत्पादन विभाग प्रमुख विशाल सावंत, कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.