शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावातील विकासकामांना  नगरविकास मंत्र्यांचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:26 IST

कोरेगाव : कोरेगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, विविध योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना त्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

ठळक मुद्देमुंबईतील बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा विविध विकासकामांना तत्वत: मंजुरी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

कोरेगाव : कोरेगाव शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, विविध योजनांसाठी तातडीने निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध विकासकामांना त्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

कोरेगाव शहरातील विकासकामांच्या अनुषंगाने विधान भवनातील डॉ. पाटील यांच्या दालनामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शशिकांत शिंंदे, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, मुख्याधिकारी श्याम गोसावी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. शहरातील तीन्ही मागासवर्गीय वस्त्यांसाठी विशेष नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेतून तरतूद करण्यास यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली. शहरासाठी आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या उभारणीस मंजुरी देण्यात आली. शहरातील शासकीय जागा नगरपंचायतीकडे वर्ग करणे, नगरपंचायतीस सुधारीत आकृतीबंध मंजूर करणे व कर्मचाºयांचा समावेश करणे, पंतप्रधान आवास योजना लागू करणे आणि शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये अद्ययावत करण्यासाठी अनुदानातून निधी उपलब्ध करुन देण्यास डॉ. पाटील यांनी संमती दर्शवली. याबाबत मुख्याधिकारी व नगरविकास विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. 

नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे व मुख्याधिकारी गोसावी यांनी प्रत्येक मुद्यांवर सविस्तर माहिती दिली. मंत्री डॉ. पाटील यांनी या कामांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन त्यातील प्रस्तावांना मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी नगरविकास कृती समितीचे संघटक राजेश बर्गे, नगरसेवक नागेश कांबळे, गणेश येवले, दीपक फडतरे, महादेव जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या विषयांवर चर्चाया बैठकीत विस्तारीत पाणी पुरवठा योजना (४० कोटी), घनकचरा प्रक्रिया प्रकल्प (५ कोटी), नगरपंचायत कार्यालय इमारत विस्तारीकरण (५० लाख), तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील मोकळी जागा विकसीत करणे (७ कोटी), प्रांताधिकारी कार्यालय जागा विकसीत करुन तेथे शॉपिंग सेंटरची उभारणी करणे (२ कोटी), जुना मोटार स्टँड-आझाद चौक भाजी मंडई विकसीत करणे (२ कोटी), शहरात उद्याने विकसीत करणे (१ कोटी), नाट्यगृह बांधणे (१० कोटी), स्मशानभूमी अद्ययावतीकरण (१ कोटी), श्री केदारेश्वर मंदिर परिसर विकसीत करणे (१० कोटी), भुयारी गटर योजना राबविणे (४० कोटी), सोलर व एलईडी पथदिवे बसविणे (१५ कोटी) अशा एकूण १३३ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.