शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: February 21, 2016 23:57 IST

कृष्णा नदीपात्र कोरडे : कारखान्यांना पाणी वापरास प्रतिबंधाची नोटीस

मिरज : कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकात सीमाभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चिकोडी व अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांना पिण्याच्या पाण्याचे साठे वापरास प्रशासनाने प्रतिबंधाची नोटीस बजावली असून पाण्याअभावी नदीकाठावरील गावांतील पाणी योजना बंद पडल्या आहेत. चिकोडी व अथणी तालुक्यातील सुमारे १०० गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमेवर कृष्णा नदीवर असलेल्या राजापूर, बंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा असून कर्नाटक हद्दीत कृष्णा नदीपात्र कोरडे आहे. उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असून नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापुर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. या गावात विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याचा वापर सुरू आहे. कृष्णानदीवर जमखंडीजवळ सहा टीएमसी क्षमतेच्या हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे केंपवाड, अथणी, कोकटनूर, हल्याळ, उगार येथील पाच साखर कारखान्यांना पिण्याच्या पाण्याचे साठे वापरण्यास प्रतिबंधाची नोटीस बजावली आहे. पाण्याअभावी साखर कारखान्यांचे गाळप किती दिवस सुरू राहणार, याबाबत अनिश्चितता आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावत असून टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे. पुढील दोन आठवड्यानंतर चिकोडी व अथणी तालुक्यातील सुमारे शंभर गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.