शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

खोडवा व्यवस्थापनासाठी दहा कोटींची अनुदान योजना

By admin | Updated: December 21, 2015 00:59 IST

मदन भोसले : पुढील हंगामात उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

भुर्इंज : ‘किसन वीर, प्रतापगड व खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या पुढील गळीत हंगाम २०१६-१७ मध्ये गाळप क्षमतेएवढा १६ लाख टन ऊस उपलब्ध होण्यासाठी किसन वीर उद्योग समूहाने खोडवा, निडवा व्यवस्थापन व सुरू हंगामातील ऊस लागवडीसाठी ९ कोटी ९२ लाख ४५ हजारांची प्रोत्साहनपर अनुदान योजना चालू लागण हंगामात त्वरित सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे,’ अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस, परतीच्या पावसाने दिलेली ओढ, धरणामध्ये सध्या असलेला कमी पाणीसाठा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे तीनही कारखान्यांमध्ये गळीत हंगाम २०१६-१७ मध्ये गाळपासाठी उसाची उपलब्धता कमालीची घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. किसन वीर उद्योग समूह व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे मोठे आव्हान आहे. त्यावर मात करून पुढील गळीत हंगामात १६ लाख टन ऊस उपलब्ध होण्यासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाचा खोडवा, निडवा ठेवण्यासाठी, सुरू हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी, यासाठी अनुदान स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येणार आहे.मदन भोसले म्हणाले, ‘कारखाना कार्यक्षेत्रातील २० हजार ७५० एकरातील खोडवा-निडवा व्यवस्थापनाचे कारखान्याने उद्दिष्ट ठेवलेले असून, त्यासाठी ८ कोटी ४२ लाख ४५ हजारांची गुंतवणूक अनुदानापोटी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी खोडवा ठेवावाकारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी यंदाच्या हंगामात तुटलेल्या उसाचा खोडवा-निडवा ठेवावा. खोडवा व्यवस्थापनासाठी आणि सुरू हंगामात ऊस लागवडीसाठी कारखान्याने जाहीर केलेल्या योजनेचा-अनुदानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक एन. बी. पाटील यांनी केले आहे.