शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

नातवाच्या डीग्री फीसाठी आजीने विकल्या टोप्या !

By admin | Updated: October 4, 2016 01:01 IST

शेख कुटुंबाने बसस्थानकात काढली रात्र

सातारा : मूळचे सोलापूरमधील शास्त्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेले शेख कुटुंबीय केवळ नातवाच्या शिक्षणासाठी पुण्यात गेले. नातवाचा डिप्लोमा पूर्ण झाला. मात्र घरची परिस्थिती हलाखीची अन् डीग्रीची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मराठा समाजाच्या महामोर्चामध्ये टोप्या विकल्या तर हातभार लागेल, ही आशा बाळगून शेख कुटुंबीय मंगळवारी रात्रीच साताऱ्यात डेरेदाखल झाले. अख्खी रात्र बसस्थानकात कशीतरी काढून सकाळी बसस्थानकासमोरच ‘मराठा क्रांती मोर्चा’ लिहिलेल्या टोप्या त्यांनी विकल्या. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या या आजीने नातवाच्या शिक्षणासाठी केलेला आटापिटा समाजाला दिशा देणारा ठरला आहे.रसुलबी शेख (वय ६५) या मूळच्या सोलापूर येथील शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या. त्यांना तीन मुले. एक रिक्षा चालक, दुसरा पाळणा चालवितो आणि तिसरा पेंटिंगचे काम करतो. सोलापूरमध्ये वास्तव्यास असताना रसुलबी शेख घरकाम करत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा नातू सोहेल याने अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. घरात त्याच्याएवढं कोणी शिकलं नाही, त्यामुळे त्याला डीग्रीचं पुढचं शिक्षण मिळावं, अशी आमच्या कुटुंबाची इच्छा होती. त्यामुळे आम्ही पुण्यात त्याच्या शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. डीग्रीची फी तर भरायचीच आहे. मात्र, कॉलेजच्या खर्च परवडणारा नसल्याने त्याला आर्थिक हातभार लागावा म्हणून आम्ही महामोर्चामध्ये टोप्या विकण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील मोर्चामध्ये आम्हाला हे सुचले नाही. मात्र, सोहेलची फी लवकरच भरायची असल्याने आम्ही साताऱ्यातील महामोर्चामध्ये काहीतरी विकायचं, असं ठरवलं. असं रसुलबी शेख भावनाविवश होऊन सांगत होत्या. मंगळवारी रात्री आठ वाजताच मी आणि माझा भाऊ साताऱ्यात आलो. साताऱ्यात आमचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे आम्ही बसस्थानकातील बाकड्यावर अख्खी रात्र काढली. डासांनी अक्षरश: फोडून काढलं. त्यामुळे झोपही फारशी लागली नसल्याचे रसुलबी यांनी सांगितले.रसुलबी आणि त्यांच्या भावाने सकाळी आठ वाजता बसस्थानक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी टोप्या विकण्यास सुरुवात केली. एक टोपी दहा रुपयांना ते विकत होते. दुपारपर्यंत त्यांच्या टोप्या बऱ्याच विकल्या गेल्या होत्या. या टोप्यांच्या विक्रीतून रसुलबी शेख यांना नातवाची संपूर्ण फी भरता येईल की नाही, याची शाश्वती देता येत नसली तरी त्यांनी या वयातही नातवाच्या शिक्षणाची उचललेली जबाबदारी इतरांना खरोखरच प्रेरणादायी ठरणारी आहे. (प्रतिनिधी)