शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात बाराशे प्रेक्षकांचे भव्य सभागृह

By admin | Updated: March 23, 2015 00:35 IST

दहा कोटींची तरतूद : चार महिन्यांत होणार लोकार्पण; आणखी निधीची आवश्यकता--जिल्हा परिषदेतून

जगदीश कोष्टी -सातारा  : यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीअंतर्गत विकासकामांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या शंभर कोटीपैकी दहा कोटी सातारा जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. त्यातून दीड एकर जागेत वातानुकूलित यशवंतराव चव्हाण सभागृह उभारण्यात येत आहे. हे सभागृह जिल्ह्यातील सर्वात मोठे अत्याधुनिक बनविण्याचा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा मानस आहे.सातारा शहर सांस्कृतिकनगरी म्हणून नावारूपास येत आहे. मात्र, अत्याधुनिक सभागृह, मोठ्या संख्येने प्रेक्षक एकाचवेळी बसतील, असे सभागृह जिल्ह्यात नसल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संयोजकांची गैरसोय होत होती. जिल्ह्याची सांस्कृतिक भूक भागविण्याचे हेरून यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी अंतर्गत राज्य शासनाच्या शंभर कोटींतून मिळालेल्या दहा कोटींतून यशवंतराव चव्हाण सभागृह बांधण्यात येत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शशिकला पिसाळ व उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून वर्षापूर्वी या सभागृहाचे भूमिपूजन झाले आहे. जून ते जुलैपर्यंत हे सभागृह सातारकरांच्या सेवेत हजर होऊ शकते. यामध्ये बाराशे लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.या प्रकल्पासाठी कोटी रुपये मंजूर झाले असले तरी आणखी दहा कोटींची गरज आहे. यासाठी पालकमंत्री विजय शिवतारेंसह राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत.