शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

‘संग्राम’ योजनेची ग्रामपंचायतींना डोकेदुखी

By admin | Updated: July 31, 2014 23:27 IST

अपुरी यंत्रणा : डोंगरपठारावरील गावांची गैरसोय

ढेबेवाडी : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या आधुनिकीकरणासाठी करोडो रुपयांचा बोजा शासनाच्या तिजोरीवर टाकला़ पारदर्शकता आणि तातडीची सेवा हा शासनाचा या मागचा उद्देश असला, तरी सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम’ म्हणजे डोके दुखी बनली आहे़ यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयातच हातोहात मिळणाऱ्या दाखल्यांसाठी वीस किलोमीटरच्या पायपिटीसह दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने शासनाने सोय केली की गैरसोय, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे़ ग्रामविकासाच्या संकल्पनेत ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने अलीकडे काही वर्षांत आमूलाग्र बदल करत ग्रामपंचायतींनाच जादा अधिकार देऊ केले आहेत़ ग्रामपंचायतींच्या कारभारात १ ते २७ नमुन्यांंना महत्त्व असूनही जन्म-मृत्यू, मिळकतीचे उतारे, विवाह नोंदी याच बाबींकडे प्रामुख्याने ‘अण्णासाहेब’ लक्ष देत होते़ इतर नमुन्यातील माहिती वर्षांनुवर्षे दुर्लक्षित केली जात असे़ शासनाने राज्यातील सुमारे २७ हजार ग्रामपंचायतींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला़ प्रत्येक ग्रामपंचायत संगणकीकृत करून स्वतंत्र ‘संग्राम’ कक्षाची निर्मिती केली़ त्यासाठी संपूर्ण यंत्रणा आणि संगणक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली़ राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेसच्या दिशेने चालू झाला आहे़ तर डोंगरपठारावरील ग्रामपंचायतींमध्ये ‘संग्राम कक्ष’ निर्माण झाला़ संगणकतज्ज्ञ कर्मचारी मिळाला; पण याठिकाणी दूरध्वनी अथवा इतर कंपन्यांचे नेटवर्कच नसल्याने आॅनलाइन काम करायचं कसं ? असा प्रश्न पडला असून नेटवर्कअभावी संग्रामचे काम ठप्प आहे़ ग्रामपंचातींचा संपूर्ण कारभार आॅनलाइन करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा होऊ लागल्याने तर दुसरीकडे नेटवर्क नसल्याने मेटाकुटीस आलेल्या ग्रामसेवकांनी अखेर अन्य गावातून ‘संग्राम’चे कामकाज चालू केले आहे़ दरम्यान, यामुळे ग्रामस्थांची तर गैरसोय होतच आहे़, शिवाय संबंधित ग्रामसेवकांच्या खिशाला चाट लागत आहे़ (वार्ताहर)ग्रामपंचायत गावात, संग्राम कक्ष परगावात---ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावरील पळशी, पाणेरी, सातर, कारळे, कसणी आदी गावांत दूरध्वनी यंत्रणा अखंडित नसल्याने या गावांत ग्रामपंचायती असूनही संग्राम कक्ष ढेबेवाडी येथे सुरू करावा लागल्याने ग्रामस्थांची अडचण तर ग्रामसेवकांचा लोढणा झाला आहे़ ----या विभागात कायमस्वरूपी संपर्क यंत्रणा कार्यान्वित व्हावी, जनतेची अडचण दूर व्हावी, यासाठी दूरसंचार विभागाकडे येथील मध्यवर्ती ठिकाणी टॉवर उभारावा, अशी अनेकदा मागणी केली़ त्यासाठी अपेक्षित जागा देण्याचीही व्यवस्था स्वत: केली आहे़; पण दूरसंचार विभाग दखल घेत नाही़ -हणमंतराव साळुंखे