शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अभिनेता गोविंदाचा ‘कलारत्न’ने गौरव--राजेंद्र यादव मित्रमंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:42 IST

कºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला.

ठळक मुद्देकºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. कºहाडकरांच्या प्रेमाने गोविंदाही भारावल्याचे पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथील यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता व माजी खासदार गोविंदा यांना यानिमित्ताने ‘कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. आणि कºहाडकरांच्या प्रेमाने गोविंदाही भारावल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कºहाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उद्योजक बाबा महाडिक, अभिनेते समृद्धी जाधव, विजय यादव, कºहाड पालिका उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शिक्षण सभापती सुनील काटकर, बाळासाहेब पवार, अ‍ॅड. विकास पवार, विकी महाडिक, विश्वेश कोरे, पैलवान धनाजी पाटील, पांडुरंग करपे, सुरेश पाटील, इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी गोविंदा म्हणाले, ‘कºहाडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. राजेंद्र यादव यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. ’उदयनराजे भोसले म्हणाले, ‘राजेंद्र यादव यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे काम केले आहे. ते कौतुकास पात्र आहे. युवकांनी सदैव यादव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.’

उदयनराजे भोसले यांची राजेंद्र यादव यांच्यावर असणारी अफाट निष्ठा व युवकांची असणारी ताकद यामुळे राजेंद्र यादव यांचे भवितव्य उज्वल असल्याचे मत यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केले. तर यादव यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे जनमानसात त्यांची प्रतिमा उमटली असल्याचे प्रतिपादन शेखर चरेगावकर यांनी केले.वीर जवान चंद्रकांत गलंडे यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने ११ गरीब मुलींचे राजेंद्र यादव मित्र मंडळाच्या वतीने पालकत्व स्वीकारण्यात आले. वागत केले. सचिन पाटील यांनी आभार मानले.शाहीर आत्माराम यादव प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारशाहीर आत्माराम यादव शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले. खोडशी, ता. कºहाड येथील पदवीधर शिक्षिका सुलभा लाड, कृष्णानगर, ता. सातारा येथील शिक्षिका स्वाती जाधव, कोडलकर वस्ती भाटकी, ता. माण शाळेच्या शिक्षिका सुवर्णा ओतारी, कºहाडच्या पालकर शाळेच्या शिक्षिका वर्षाराणी पवार, कºहाड पालिकेच्या शाळा क्रमांक पाचचे शिक्षक बेग, बेलोशी, ता. जावळी येथील शिक्षक अनिल जाधव यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.कºहाड येथे राजेंद्र यादव यांच्या हस्ते अभिनेता गोविंदा यांना ‘कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी जयवंतराव पाटील, शेखर चरेगावकर, सचिन पाटील, पैलवान आनंदराव मोहिते उपस्थित होते.