शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर गोविंद पानसरे अमर रहे!

By admin | Updated: March 3, 2015 22:44 IST

मृत्युनंतरही अकाऊंट सुरूच : चित्रफीत, ध्वनिफित, लेख अन् छायाचित्रांसाठी कार्यकर्ता पुढे सरसावला..

जगदीश कोष्टी -सातारा -‘गोळ्या झाडून माणूस संपविता येतो; पण विचार संपविता येत नाही,’ असं म्हटलं जातं. ‘अंनिस’चे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. त्याचप्रमाणे कॉ. गोविंद पानसरे यांचेही आहे. त्यांच्यामागे त्यांचे विचार तरुणांंपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असून, फेसबुकच्या माध्यमातून केले जात आहे.कॉ. गोविंद पानसरे यांना आधुनिक यंत्रणा हाताळण्याची माहिती नव्हती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानाची महती त्यांना चांगली होती. त्यामुळे त्यांचे सहकारी सुशील लाड यांनी कॉ. पानसरे यांच्या नावाने तीन-चार वर्षांपूर्वी फेसबुकवर अकाउंट काढून दिले. हे अकाउंट हाताळायची माहिती नसली तरी पोस्ट कशी करायची, लाईक करणे म्हणजे काय, कॉमेंट कशी टाकायची हे त्यांना कार्यकर्त्यांनी शिकविले होते.चळवळीत राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेचे अधिवेशन, आंदोलन किंवा बैठक असल्यास त्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी पानसरे हे फेसबुकचा वापर करत होते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प किंवा राज्य तसेच देश पातळीवरील नेत्यांच्या भाषणानंतर स्वत:चे मत नोंदविण्यासाठी पानसरे फेसबुकचा वापर करत होते. त्यांना हवे असलेले मत ते लाड यांना सांगत अन् लाड त्यांचे मत अपलोड करत होते. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर त्यांचे अकाउंट बंद न करता ते तसेच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे असंख्य कार्यकर्ते, तरुणाई चळवळीशी जोडली गेली आहे. विविध पुस्तकांमधून पानसरे यांनी व्यक्त केलेले विचार, मत-मतांतरे, त्यांच्या भाषणाच्या चित्रफित, ध्वनिफित, फोटो, दुर्मीळ लेख फेसबुक मित्रांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा लाड यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)कॉ. गोविंद पानसरे यांचे फेसबुक अकाउंट तीन ते चार वर्षांपासून मी चालवत आहे. फेसबूकवर काही पोस्ट करायचे असले की ते मला सांगत असत. हे अकाउंट यापुढेच चालूच ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या अकाउंटला पाच हजार मित्र झालेले आहेत. त्यांच्या फालोअर्सची संख्या वाढत आहेत. त्यामुळे फेसबुक अकाउंटचे आता पेजमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे. - सुशील लाडचळवळीतील कार्यकर्ते.‘कार्ल मार्क्स’चा चाहतापानसरे यांनी फेसबुक अकाउंटमध्ये स्वत:विषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पक्षात मी कार्यरत असून, कार्ल मार्क्सचा मोठा चाहता आहे. महाराष्ट्रात समता प्रस्तापित करण्यासाठी मी संघर्ष करत राहीन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक भाग बनणार आहे.’