शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

म्युकरमायकोसिस रुग्णांवर सरकारतर्फे उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:41 IST

सातारा : म्युकरमायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो. ...

सातारा : म्युकरमायकोसिस संसर्ग असलेले रुग्ण सध्या जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. वेळेत निदान व उपचार झाल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होतो. या म्युकरमायकोसिसवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाबरोबरच कऱ्हाड येथील सह्याद्री हॉस्पिटल व कृष्णा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांमध्ये ही उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

या आजारासाठी वरील हॉस्पिटलसाठी नोडल अधिकारी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक देविदास बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी ज्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. या आजारावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातात, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कळविले आहे.

म्युकरमायकोसिस काय आहे : म्युकरमायकोसिस (काळी बुरशी/ब्लॅक फंगर्स) हा एक सामान्यतः दुर्मिळ असा बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) आजार आहे. कोरोनाकाळात ह्या आजाराचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा रोग प्रामुख्याने वैद्यकीय समस्या असणाऱ्या लोकांना प्रभावित करतो. त्यामुळे त्यांची रोगाविरुद्ध लढ्याची क्षमता कमी होते.

म्युकरमायकोसिस कशामुळे होतो : म्युकर नावाची बुरशी जमिनीत, खतांमध्ये सडणाऱ्या फळात व भाज्यात, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या नाकात आणि नाकाच्या स्त्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते, जसे कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही बाधा असलेले रुग्ण, ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे असे रुग्ण, अशांमध्येही म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. अधिकच्या माहितीसाठी १०४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

या रोगाचा अधिक धोका कोणाला आहे : ज्यांना स्टेरॉईड औषधे दिली जात आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, ज्यांचा डायबिटीस अनियंत्रित आहे, ज्यांना कर्करोग आहे किंवा ज्यांचे नुकतेच अवयव प्रत्यारोपण झाले आहे, ज्यांना इम्यूनमोड्युलेटर्स अर्थात रोगप्रतिकारशक्तीत फेरफार करणारी औषधे दिली जात आहेत, जे प्रदीर्घ काळ आयसीयू म्हणजे अतिदक्षता कक्षात दाखल आहेत, ज्यांना प्रदीर्घ काळापासून ऑक्सिजन थेरपी दिली जात आहे व ज्यांना जुनाट किडनी (मूत्रपिंड) किंवा लिव्हर (यकृत) आजार आहे.

धोकादायक परिणाम टाळण्यासाठी या लक्षणांवर लक्ष ठेवा : डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाक चोंदणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम.

हे करा : रक्तातील साखरेची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविड-१९ नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायरमध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा व ॲंटिबायोटिक्स/ॲंटिफंगल औषधांचा वापर डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा.

हे करु नका : आजाराची चिन्हे आणि लक्षणे याकडे दुर्लक्ष करु नका, बंद असणारे नाक हे बॅक्टेरिअल सायनुसायटिसमुळे असावे असा विचार करु नका. या आजाराची तपासणी करुन घेण्यास आग्रही रहा, दुर्लक्ष करु नका व म्युकरमायकोसिस या आजारावर त्वरित उपचार करा व वेळ घालवू नका.