शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By admin | Updated: December 31, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : साजूर येथे विविध कामांचे भूमीपूजन, उद्घाटन

\तांबवे : ‘युवकांच्या हाताला काम द्यायचे असेल तर मोठ-मोठे उद्योगधंदे तालुक्यात आले पाहिजेत. शेतीमध्ये औद्योगिकरण झाले तर सर्वांगिण विकास होईल. सध्या सरकारला प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने, केलेल्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे गंभीर दुष्काळ समस्या निर्माण झाली आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. साजूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील, सरपंच शीतल मुळगावकर, उपसरपंच संदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे, विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रकाश वास्के, जे. के. पाटील, सुरेखा डुबल, सूपने सरपंच प्रदीप थोरात, जखिणवाडी सरपंच नरेंद्र पाटील, इंद्रजित चव्हाण, अ‍ॅड. विश्वास निकम, अशोक पाटील आदी उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचा विकास कामातून कायापालट करणार आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील प्रशासनाची घडी बसविली आहे. यामुळे आज आपले राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. साखरेचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ मिळते की नाही याची चिंता आहे. शेतकऱ्याला आपल्या पायावर उभे करायचे असेल, तर या सरकारने कर्जमाफी करू न त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. आज लोकसहभागातून गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी झटले पाहिजे,’ असे त्यांनी यावेळी सांगितले.आमदार पाटील म्हणाले, ‘तांबवे जिल्हा परिषद मतदार संघ कुणी पाटणला जोडला हे सर्वांनाच ज्ञात आहे. काँग्रेसची अनेक पदे भोगूनही पदाविरूद्ध कामे केली आहेत. त्यांना बाबांनी विधानसभेमध्ये जनाधार दाखविला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कऱ्हाड तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी विकासकामासाठी आणला आहे.’यावेळी शीतल मुळगावकर, विकास कांबळे, पी. डी. पाटील, प्रकाश पाटील, हिंदुराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शीतल मुळगावकर व उपसरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले.विकास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.विजय चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)