यावेळी वजनकाट्यामध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने, जयवंत शुगर्सचा वजनकाटा हा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीकडून देण्यात आले. त्यामुळे जयवंत शुगरच्या वजनकाट्याला शासनाकडून विश्वासार्हतेची मोहोर प्राप्त झाली आहे.
विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. त्यानुसार कऱ्हाडचे नायब तहसीलदार व्ही. आर. माने, वैद्यमापनशास्त्र निरीक्षक रा. पां. आखरे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, युवाध्यक्ष विश्वास जाधव आदींनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा समितीने दिला. कारखान्याचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एस. सोमदे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.