शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या ‘सेल्फी’वर सरकारी मोहर

By admin | Updated: October 6, 2016 01:12 IST

स्वच्छ भारत विषय : चौधरवाडी गावच्या सुयश शिंदे यांचा लघुपट देशात तिसरा

वाठार स्टेशन : राष्ट्रीय चित्रपट विकास संस्था (एनएफडीसी) आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छ भारत’ या विषयावरील लघुपट महोत्सवात देशभरातून चार हजार आठशे जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये चौधरवाडी, ता. कोरेगाव येथील डॉ. सुयश तानाजीराव शिंदे यांनी ग्रामीण कथानकावर आधारित तयार केलेल्या ‘सेल्फी’ या लघुपटास देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातील पहिल्यांदाच अशा प्रकारचे यश मिळविणारा हा पहिलाच लघुपट ठरला आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील चौधरवाडी सारख्या छोट्याशा गावात जन्मलेले डॉ. सुयश शिंदे हे सध्या पुणे येथे दंत चिकित्सक म्हणून डॉक्टरी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाबरोबरच त्यांनी लघुपट, चित्रपट निर्मितीचा छंद जोपासला आहे. व्यवसायाने डॉक्टर असतानाही गावच्या मातीशी एकरूप असलेल्या सुयश यांनी ‘सेल्फी’ हे उघड्यावर शौचाला न बसण्या विषयीच्या सरकारने दिलेल्या सूचना आणि सुविधा त्याचा ग्रामीण पातळीवरील काही काळ होणारा दुरुपयोग आणि त्यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न यावर हा लघुपट बनविला आहे.यामध्ये प्रशांत तपस्वी, प्रेम नरसाळे आणि अंजली जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या लघुपटात रोगराई, जंतू आणि फिव्हर, बसू नको रे उघड्यावर असं एक गीत ही प्रदर्शित करण्यात आले आहे. केवळ तीन मिनिटांत अपेक्षित संदेश पोहोचण्याचा शिंदे यांनी केलेला प्रयत्न परीक्षक निर्माती वीणा त्रिपाठी, अ‍ॅडमेकर प्रल्हाद ककड आणि फिल्ममेकर गीतांजली राव यांनी उचलून धरला. देशभरातील चार हजार आठशे लघुपटातून त्यांच्या ‘सेल्फी’ या लघुपटाची झालेली निवड ही सातारा जिल्ह्यासाठी भूषणावह मानली जात आहे.डॉ. सुयश शिंदे यांचा या यशाबद्दल नुकताच दिल्ली येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, गायक कैलाश खैर उपस्थित होते.डॉ. शिंदे यांनी यापूर्वी स्त्री भ्रूणहत्या विषयी भाष्य करणारा व्हॉट इफ आणि दुसऱ्यांच्या आनंदात गवसलेला मुलाचा क्वेस्ट फॉर हॅपिनेस या दोन लघुपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या सिनेमाचे सहायक म्हणूनही काम पाहिले आहे. (वार्ताहर)