शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घरात सरकारचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:15 IST

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी ...

सातारा : ‘नवीन वीज कनेक्शन देणे तर सोडाच, उलट सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकºयांची वीज तोडून सध्याच्या सरकारने फार मोठे पाप केले आहे. राज्यात आठ कोटींची गुंतवणूक आणल्याच्या बाता मारणाºया भाजप सरकारने सातारा जिल्ह्यात किती गुंतवणूक आणली?,’ असा खणखणीत सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताºयाच्या सभेत विचारला.राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त गांधी मैदानावरील सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘जिल्हा बँकेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे. असे असताना बँकेच्या भरती प्रक्रियेला स्टे आणला. केवळ युवकांची बेरोजगारी वाढावी, हाच हेतू विरोधकांचा असतो. आमचे सरकार असताना साताºयाच्या कोणत्याही समस्येबाबत शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे शरद पवारांना फोन करून विचारत होते. मात्र, आता कोण वाली आहे का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवार पुढे म्हणाले, ‘जीएसटीनं शेतकºयांचं अक्षरश: कंबरटे मोडले आहे. एवढेच नव्हे शेतकºयांच्या कंपोस्ट खतावरही जीएसटी लावण्यात आला आहे. आता शेतकºयांनी नेमकं करायचं काय, हा मोठा प्रश्न आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याच सोशल मीडियाचा दुहेरी वापर सध्या मोदींवर उलटला आहे. मोदी सरकारने जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापलीकडे काहीच काम केले नाही. अशा प्रकारचे राष्ट्रवादी पक्ष कोणतेही राजकारण करत नाही. कोरेगाव-भीमा प्रकरणातही भाजप सरकाकडून ढिलाईपणा दाखविला गेला. मी उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला होता. मात्र, या सरकारने पोलीस बंदोबस्त का दिला नाही, हे कोडे आहे. या प्रकरणातील मास्टर मार्इंड शोधला पाहिजे.’कोणते ना कोणते कारण शोधून राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. नगरमध्ये शिवेसनेच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्याने हत्या केली. तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्'ाची कबुली देतोय. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक कशी होते? हे न उलगडणारे कोडे आहे.’साताºयाचा मालक समजू नये : शिवेंद्रसिंहराजेसाताºयातील युवकवर्ग सुज्ञ असून, राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे. त्यामुळे साताºयाचा मालक मी आहे, असे कोणी समजू नये, असा उपारोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता लगावला. सातारा जिल्ह्याचे चित्र वेगळं दाखविले जात आहे. वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष देऊन राष्ट्रवादीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.