शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोसावेवाडीत भावाचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:53 IST

कºहाड/मसूर : गोसावेवाडी (ता. कºहाड) येथून गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी एका विहिरीत आढळून ...

कºहाड/मसूर : गोसावेवाडी (ता. कºहाड) येथून गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी एका विहिरीत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुलाच्या चुलत भावालाच अटक केली असून, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावेवाडी येथे तानाजी बनसोडे हे पत्नी शैला व तीन अपत्यांसह राहण्यास आहेत. बनसोडे यांचा अकरा वर्षांचा तेजस हा मुलगा माळवाडी येथील मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी (दि. १२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मदर तेरेसा स्कूलची बस गोसावेवाडी येथे आली. तेजस व त्याची मोठी बहीण विजया हे दोघेजण त्या बसमधून शाळेला गेले. आई-वडील संध्याकाळी घरात आल्यानंतर घरात वैशाली व विजया या दोन मुली होत्या. तानाजी यांनी तेजसबाबत विचारणा केली असता त्याला त्याचा चुलत भाऊ समाधान याने दुपारी जेवायला त्याच्या घरी नेले होते, असे मुलींनी तानाजी यांना सांगितले. त्यामुळे तानाजी हे समाधानकडे तेजसबाबत विचारणा करायला गेले. मात्र, तेजस जेवण करून दुपारीच निघून गेल्याचे व मी शेतात गेलो होतो, असे समाधानने सांगितले.तेजस बेपत्ता झाल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी याबाबतची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी बेपत्ता तेजसचा शोध सुरू केला.दरम्यान, मंगळवारी सायंकाळी विहिरीत तेजसचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. पोलीसही तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कºहाडला पाठवून दिला.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हा खून मृत तेजसचा चुलत भाऊ समाधान निवास बनसोडे याने केल्याचे उघडकीस येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा समाधान बनसोडे याला अटक करण्यात आली आहे.मधाचं पोळं काढण्याचा बहाणा!तेजस शाळेतून दुपारी घरी आल्यानंतर चुलत भाऊ समाधानने हाक मारून त्याला बोलावून घेतले. ‘रानातून मधाचं पोळं काढायचं आहे. मध खायला देतो,’ असे सांगून त्याने तेजसला शिवारातील पडक्या विहिरीकडे नेले आणि विहिरीत ढकलून देऊन त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सांगितले.