शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोरेंचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: December 26, 2016 23:48 IST

विनयभंग प्रकरण : उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत अर्जावर आज सुनावणी

सातारा : विनयभंगप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी, असा आमदार गोरे यांनी अर्ज केला. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत निर्णय होईपर्यंत पोलिसांनी आमदार गोरे यांना अटक करु नये, अशा सूचना दिल्या. याप्रकरणी आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सातारा येथील एका विवाहित महिलेच्या मोबाईलवर आमदार जयकुमार गोरे यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार गोरे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी अ‍ॅड. डी. व्ही. पाटील यांनी अर्ज केला होता. गोरे यांच्या वतीने अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी युक्तीवाद केला. त्यात फिर्यादीकडूनही मेसेज पाठवण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. आपण कुठल्याही मोबाईलवरुन मेसेज पाठवले नसल्याचे शपथपत्र फिर्यादीच्या वतीने न्यायालयात दाखल केले. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी सोमवारी आमदार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय दिला. यावेळी न्यायालयात आणि न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयावर अ‍ॅड. पाटील यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी आवश्यक मुदत हवी असल्याचा विनंती अर्ज केला. तोपर्यंत आ. गोरे यांना अटक न करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास द्यावेत, अशी मागणीही केली. यावेळीही दोन्ही बाजूने विविध खटल्यातील निकाल युक्तीवाद म्हणून सादर केले गेले. त्यावर न्यायाधीश मोहिते यांनी ‘निर्णय होत नाही तोपर्यंत आमदार गोरे यांना पोलिसांनी अटक करु नये,’ असे निर्देश दिले. याप्रकरणी आता मंगळवारी सकाळी ११ वाजता वाजता सुनावणी होणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद ओक हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)कॉँग्रेसचा गद्दार चर्चेत...‘मला विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्यामागे राष्ट्रवादीप्रमाणेच कॉँग्रेस पक्षातीलही काही गद्दारांचा समावेश आहे,’ असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर गेल्या बावीस दिवसात कॉँग्रेसच्या एकाही नेत्याने याबाबत ब्र शब्द उच्चारला नव्हता. परंतु सोमवारी कॉँग्रेस भवनमध्ये जिल्हाध्यक्ष व आमदार आनंदराव पाटील यांना याबाबत छेडले असता ‘जयकुमारांनी गद्दारांची नावे जाहीर करावीत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल,’ असे सांगितले.