शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडी धरणात पोहताना तारळेतील सोनाराचा मुलगा बुडाला; चार मित्रांना धक्का

By दत्ता यादव | Updated: April 25, 2023 21:55 IST

सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालय शिकत होता. चार ते पाच मित्रांसमवेत तो मंगळवारी दुपारी परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाकडे गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कण्हेर धरणात पोहायला गेलेल्या अकलूजच्या भावी डाॅक्टरचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच परळी खोऱ्यातील उरमोडी धरणामध्येही मित्रांसमवेत पाेहायला गेलेला तरुण धरणात बुडाला आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

सागर महादेव देवकर (वय २१, रा. तारळे, ता. पाटण) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालय शिकत होता. चार ते पाच मित्रांसमवेत तो मंगळवारी दुपारी परळी खोऱ्यातील उरमोडी धरणाकडे गेला होता. त्यावेळी सर्व मित्र धरणात पोहण्यासाठी उतरले. सागर सुद्धा धरणात पोहण्यासाठी उतरला. तो धरणात पोहत असताना त्याला दम लागला. यातच तो बुडाला. त्याच्या मित्रांच्या हा प्रकार निदर्शनास आला. मात्र, त्याला वाचवता आले नाही. 

या प्रकाराची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने तीन तास शोध मोहीम राबविली. मात्र, सागरचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

मित्रांना मानसिक धक्का...

सागर देवकर यांच्या वडिलांचे तारळे येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. तो मित्रांसमवेत साताऱ्यातच वास्तव्य करत होता. तो एकुलता एक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे त्याच्या मित्रांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे