शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील सोन्याची नाणी साताऱ्यातील संग्रहालयात विसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडजवळील चिखली येथे काही महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी खोदकाम करत असताना तांब्याचा चरवीच्या आकाराचा मोठा गढवा (भांडे) सापडला होता. या गढव्यात सोन्याची तब्बल २१६ नाणी सापडली असून, त्यांचे वजन २ हजार ३५७ ग्रॅम इतके आहे. या नाण्यांच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सर्व नाणी ताब्यात घेऊन ती पुरातत्वकडे हस्तांतरित केली.

ही नाणी सिराजउद्दीन मोहम्मद शहा बहादूर दुसरा याच्या काळातील व १८३५ ते १८८० या कालखंडातील असावीत, असा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे. पुणे, मुंबई व नजीकच्या शहरांत शासकीय वस्तुसंग्रहालय नसल्याने पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी साताऱ्यातील संग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सोन्याची २१६ नाणी व तांब्याचा गडवा सुपूर्द केला. यावेळी संग्रहालयाचे कर्मचारी गणेश पवार, अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदान भांबळ आदी उपस्थित होते.

(चौकट)

साठ वर्षांनंतर सुवर्णयोग

उत्खननात अथवा बांधकामावेळी आढळलेली काही नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात यापूर्वी जमा करण्यात आली आहेत. दहा वर्षांपूर्वी कोयनेत तांब्याची ५०० नाणी आढळली होती तर गेल्याच वर्षी इंदापूर येथे चांदीची ७५ नाणी सापडली होती. ही नाणीही सातारा येथील संग्रहालयात जमा करण्यात आली आहेत. मात्र, सोन्याची नाणी इतक्या मोठ्या संख्येने संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याची ही गेल्या ५१ वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

(पॉइंटर)

सोन्याची नाणी २१६

नाण्यांचे वजन २,३५७ ग्रॅम

तांब्याचा गडवा ५२६ ग्रॅम

नाण्यांचा कालखंड १८३५ ते १८८०

(कोट)

पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी नुकतीच सातारा संग्रहालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. ही नाणी पुरातन आणि मौल्यवान असून, त्यांचे संवर्धन केले जाईल. जुन्या संग्रहालयाची जागा वस्तूंसाठी अपुरी पडू लागल्याने हजेरी माळावर नवे संग्रहालय उभारले जात आहे. सध्या संग्रहालयाच्या इमारतीचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जात आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर हे संग्रहालय सातारकरांच्या सेवेत लवकरात लवकर दाखल होईल, अशी आशा आहे.

- प्रवीण शिंदे, अभिरक्षक

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

फोटो मेल