शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

खंबाटकी घाटातून जाताय? ...सावधान!

By admin | Updated: December 2, 2014 23:35 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे प्रवास झालाय जीवघेणा

खंडाळा : खंबाटकी घाटातील अरुंद वळण रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साईडपट्ट्या यामुळे घाटरस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाकडे अनेकदा सूचना करूनही यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे खंबाटकी घाटातील प्रवास आल्हादायक वाटत असला तरी तो तितकाच घातकही आहे. त्यामुळे प्रवाशांनो जरा जपूनच...खंबाटकी घाट व बोगदा परिसर अनेक प्राणघातक अपघाती घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत शेकडो प्रवाशांचा नाहक बळी गेला आहे. अपघातानंतर अनेकदा रस्त्याच्या सुधारणांबाबत प्रशासनाकडे सूचना केल्या जातात. मात्र तात्पुरती होकारार्थी मान डोलावणारे अधिकारी पुन्हा लक्षही देत नाहीत. हे नेहमीचाच अनुभव खंडाळकरांसाठी आहे. पूण्याहून साताराकडे जाताना लागणाऱ्या घाटातील रस्त्याची दुरवस्था आहे. या स्त्यावरील ठिकठिकाणचे संरक्षक कठडे तुटून पडले आहेत. याठिकाणी वाळूची पोती भरून ठेवली असली तरी अपघातात गाडी कोसळून घाटात जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वाहनांना प्रवास करता येत नाहीत. घाटातील ही स्थिती प्रवासासाठी घातक ठरत आहे. मात्र हायवे प्रशासन मात्र अद्यापही गांधारीच्याच भुमिकेत आहे.साताराहून पुण्याकडे जाताना बोगदा ओलांडल्यानंतरही रस्त्याची वळणे घातक ठरत आहेत. अशास्त्रीय वळणांमुळे कित्येक अपघात घडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासगी बसच्या अपघातामुळे वळणांचा धोका प्रकर्षाने जाणवला होता. यानंतर ही वळणे काढून सरळ रस्ता बनविण्याचे प्रशासनाने ठरवले होते. या वळणांवर केवळ पांढरे पट्टे ओढून सूचना फलक लावले आहेत. (प्रतिनिधी)