शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोडोलीत उद्रेक;आता आमची सटकली!

By admin | Updated: August 29, 2014 23:08 IST

रस्त्यावर पुन्हा पाणी : संतप्त नागरिकांनी चेंबर फोडून ओढा केला मोकळा

सातारा : डोंगरउतारावरील पाण्याचे नैसर्गिक मार्ग अडविले गेल्यामुळे गोडोली परिसरात सातत्याने पाणी साचून नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त गोडोलीकरांनी ओढ्यावर बांधलेले चेंबर आणि सिमेंटची वाहिनी शुक्रवारी फोडली. विघ्नहर्त्याच्या आगमनादिवशीच पाणी साचून राहिल्याने गोडोलीत पुन्हा भीतीची आणि त्यापाठोपाठ संतापाची लाट उसळली.वीस आॅगस्ट रोजी साताऱ्यात पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस झाला. अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहत येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांचे प्रवाह जागोजागी अडविल्याने आणि वळविल्याने गोडोलीत तुडुंब पाणी साचले होते. चिखलमिश्रित पाण्याने लाखोंचे नुकसान झाले होते. त्यानंतर नैसर्गिक प्रवाह अडविण्याचा आणि वळविण्याचा विषय ऐरणीवर आला होता. वीस तारखेच्या हाहाकारानंतर दररोज दुपारी अंधारून येत होते आणि जोरदार पाऊस पडत होता. प्रत्येक वेळी गोडोलीकरांच्या छातीत धस्स होत होते. ओढ्यांवरील अतिक्रमणे काढावीत आणि नैसर्गिक प्रवाह वळविण्याचा खटाटोप थांबवावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गोडोलीकरांनी सातारा-कऱ्हाड मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. दरम्यान, काही मंडळी यात राजकारण आणत असल्याचा आरोप करून पत्रकबाजी सुरू झाली आणि या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. ओढा सिमेंटच्या पाइपमध्ये बंदिस्त करून दोन चेंबर बांधण्यात आल्याने त्याचे पाणी साचून परिसरात पसरत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ही त्रुटी सुधारण्यासाठी पावले टाकली जातील, अशी आश्वासने दिली गेली. तसेच ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणीही केली होती. तथापि, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही आणि पाऊस मात्र कोसळत राहिला. शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीच परिसरात पाणी साचू लागल्याने नागरिकांची ‘सटकली’ आणि त्यांनी पहारी हाती घेतल्या. ओढ्याचा प्रवाह बंदिस्त वाहिनीतून एका चेंबरमध्ये सोडण्यात आला आहे, ते चेंबरच फोडण्यास नागरिकांनी सुरुवात केली. त्याला जोडलेली वाहिनीही फोडण्यास नागरिकांनी प्रारंभ केला. ओढ्याच्या पाण्याला नैसर्गिक वाट मोकळी करून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)